नवी दिल्ली 07 मे : लग्न (Marriage) प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक असतं. लग्नानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात मोठं स्थित्यंतर येतं. स्त्री आणि पुरुष दोघांच्या जीवनात लग्नानंतर अनेक बदल होतात. प्रत्येक नवीन जोडप्याला आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल (Married Life) उत्सुकता असते. लग्न जुळल्यापासून ते लग्न लागण्याच्या कालावधीमध्ये ते आपल्या वैवाहिक जीवनाविषयी स्वप्नं रंगवत असतात. एकूणच काय तर लग्न हा एक सुखद सोहळा मानला जातो. मात्र, याला काही अपवाददेखील असतात. लग्नाच्या वरातीत डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यू; पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक! कधीकधी काही जोडप्यांच्या लग्नाचा दिवस त्यांच्यासाठी कटू आठवणी (Bad Memories) घेऊन येतो. उत्तर प्रदेशातील मुराबादमधील विशाल आणि शीतल यांच्याबाबतीत हेच घडलं. लग्नस्थळी जात असलेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात (Accident) होऊन सात वऱ्हाड्यांचा मृत्यू (Death) झाल्यानं विशाल व शीतलच्या लग्नाला गालबोट लागलं. अपघात झाल्यामुळे अतिशय शांततेत नियोजित लग्नसोहळा उरकून घेण्यात आला. लाइव्ह हिंदुस्थाननं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मुरादाबादमधील (Moradabad) डिलारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहरा माफी गावात राहणाऱ्या विशाल आणि अझीमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काशीपूर आंगा गावातील शीतल यांचा लग्नसोहळा होणार होता. काल (शुक्रवार, 6 मे) मुलीच्या गावी हा नियोजित सोहळा पार पडणार होता. त्यासाठी नवरदेव (Groom) आणि त्यासोबत वऱ्हाडी लग्नस्थळी निघालेही होते. मात्र, रस्त्यात वऱ्हाड घेऊन जाणारी इनोव्हा कार (Innova Car) अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला (Electricity Pole) आणि नंतर झाडावर जाऊन धडकली. या अपघातात कारमधील सात जणांचा मृत्यू झाला, तर चालकासह चार जण जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. नवरीच्या गावात पोहोचण्यापूर्वीच सर्व वऱ्हाडी माघारी फिरले. काहींनी घटनास्थळी धाव घेतली तर काहींनी जखमींना मदत करण्यासाठी जिल्हा रुग्णालय (District Hospital) गाठलं. अजबच! फक्त 180 रुपयांच्या चप्पल चोरीमुळे पोलीसही चिंतेत; तक्रार येताच सुरू केला तपास कारण… अपघाताची बातमी नवरीच्या गावात पोहोचल्यानंतर तिथेही खळबळ उडाली. अपघातात सात वऱ्हाड्यांचा मृत्यू झाल्यानं कुठलाही गाजावाजा न करता दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नवरदेव लग्नस्थळी पोहोचला. यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात (Mourning Atmosphere) लग्नाचे विधी पार पडले. यावेळी सर्वांचे डोळे पाणावलेले होते. अगदी नवरदेवालाही अनेक वेळा अश्रू (Tears) अनावर झाले. सायंकाळी उशिरापर्यंत लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले. शोकाकुल वातावरणामध्येच नववधूची पाठवणी झाली. आपल्या लग्नाच्या दिवशी सात लोकांचा जीव गेल्याची घटना नवरीला (Bride) सहन न झाल्यानं पाठवणीच्यावेळी तीदेखील बेशुद्ध (Unconscious) झाली होती. लग्नाला जाताना झालेल्या भयानक अपघातामुळे नवरदेवाच्या गावी शोककळा पसरली आहे.