JOIN US
मराठी बातम्या / देश / बेळगावात ट्रक आणि खासगी बसमध्ये जोरदार धडक, 8 जणांचा मृत्यू तर 26 जखमी, मृतक कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील

बेळगावात ट्रक आणि खासगी बसमध्ये जोरदार धडक, 8 जणांचा मृत्यू तर 26 जखमी, मृतक कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील

बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील रहिवाशांचा समावेश आहे.

जाहिरात

बेळगावात ट्रक आणि खासगी बसमध्ये जोरदार धडक; 8 जणांचा मृत्यू 26 जखमी, मृतक पुणे आणि कोल्हापुरातील

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी बेळगाव, 24 मे : हुबळी-धारवाडच्या तरीहाळा बायपासवर भीषण अपघात (major accident) झाला आहे. ट्रक आणि खासगी बस यांच्यात जोरदार धडक (Lorry and private bus collied each other) झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 26 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सहा मृतक हे कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसही दाखल झाले. यानंतर मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू झालं. वाचा :  राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण यांना राष्ट्रवादीने रसद पुरवली? मनसेने शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण तीन दिवसांपूर्वी धारवाडमध्ये अपघातात 7 जणांचा मृत्यू कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला होता. भरधाव गाडी थेट एका झाडाला जाऊन धडकली होती. हा अपघात इतका भीषण होता की त्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 जण जखमी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर तिघांचा हुबळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तरप्रदेशात बोलेरो-ट्रेलरच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जोगिया ठाणे परिसरातील कटया गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरला वऱ्हाडींनी भरलेल्या बोलेरोने जोरदार धडक दिली. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ही बोलेरो बांसी कोतवाली क्षेत्राच्या महुवआ गावातील एका लग्नातून परतत होते. हे वऱ्हाड शोहरातगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महला गावातील होते. लग्नानंतर ते शनिवारी रात्रीच्या सुमारास परतत होते. यावेळी गाडीत चालकासह 11 जण होते. जोगिया ठाणे परिसरातील कटया गावाजवळ पोहोचल्यावर बोलेरोने ट्रेलरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, तब्बल 8 जणांचा यात मृत्यू झाला. गंगा गौड नावाच्या व्यक्तिच्या मुलाच्या लग्नाहून हे सर्वजण परतत होते. मात्र, रस्त्यातच भीषण अपघात झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या