JOIN US
मराठी बातम्या / देश / Weather Update: महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये IMD चा इशारा, पुढचे चार मुसळधार पावसाची शक्यता

Weather Update: महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये IMD चा इशारा, पुढचे चार मुसळधार पावसाची शक्यता

Weather Update: येत्या चार दिवसात महाराष्ट्र, (Maharashtra) गोव्यासह (Goa) 6 राज्यांच्या किमान भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rains) होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: देशातल्या अनेक भागातून मान्सून (Monsoon)आता परतीच्या मार्गावर आहे. तर काही राज्यांमध्ये पावसाचा दौरा अद्याप पूर्ण शिल्लक आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या चार दिवसात महाराष्ट्र, (Maharashtra) गोव्यासह (Goa) 6 राज्यांच्या किमान भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rains) होण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सूनच्या परतीला विलंब झाल्याचे सांगितलं जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारी अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकातील किनारपट्टी भाग, केरळ आणि पुद्दुचेरी येथील माहे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागात 9 ऑक्टोबरला देखील मुसळधार पाऊस पडू शकतो. या राज्यांव्यतिरिक्त, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही 10 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या क्षेत्रात 11 ऑक्टोबर रोजी या मुसळधार पाऊस पडू शकतो. हेही वाचा-   IPL 2021: टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी Good News, विराटचा ‘हा’ सहकारी जबरदस्त फॉर्मात   आयएमडीच्या नॅशनल वेदर फोरकास्टिंग सेंटरचे वरिष्ठ पूर्वानुमानकार आर के जेनामणीी यांनी सांगितलं की, 1960 नंतर ही दुसरी वेळ आहे, जेव्हा मान्सून इतक्या उशिरा परतत आहे. 2019 मध्ये, 9 ऑक्टोबरपासून मान्सून वायव्य भारतातून परतण्यास सुरुवात केली होती. एकूणच, देशात जूनमध्ये 110 टक्के, जुलैमध्ये 93 टक्के आणि ऑगस्टमध्ये 76 टक्के पाऊस झाला आहे. या महिन्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाला असला तरी सप्टेंबरमध्ये त्याची उणीव भरुन निघाली कारण सप्टेंबरमध्ये 135 टक्के रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. महाराष्ट्रात कसा असेल पाऊस गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं (Heavy Rainfall in Maharashtra) झोडपलं आहे. पुण्यासह ठाणे आणि घाट परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस (Cloudburst Rain) झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अधिक असणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा-  लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आता बंगालच्या उपसागरात पुढील तीन दिवसांत पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबरनंतर पुढील चार ते पाच दिवसांत हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून 10 ऑक्टोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या