अहमदाबाद, 30 मार्च : ‘‘जसं आम्ही सर्वजण आज एकत्र आलो. तसंच तुम्हीसुद्धा एकत्र येऊन दाखवा आणि एकमुखानं सांगा कोण बनेल तुमचा पंतप्रधान? आम्हाला सत्ता जरूर हवी आहे, पण आम्ही खुर्चीसाठी पागल झालेलो नाहीत.’’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच ‘‘आमच्यामध्ये मतभेद नक्की होते. मात्र, आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मनाने एक झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकच असल्याने आम्ही एकत्र आलो आहोत,’’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरचे भाजपचे उमेदवार अमित शहा यांना शुभेच्छा दिला.