कराची, 17 जुलै: मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिस सईद याला पाकिस्तान सरकारने लाहोरमधून अटक केली आहे. सईद विरुद्ध कारवाई करण्यासाठी भारताने पाकिस्तानवर सातत्याने दबाव टाकला होता. सईदवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव देखील होता. काही महिन्यांपूर्वी त्याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी सईदला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान मीडियाने दिलेल्या माहितीनुसार सईदला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. मुंबई हल्ला, उरी आणि पुलवामा येथे भारतीय लष्करावर झालेले हल्ले यामागे सईदचा हात होता. 2009मध्ये झालेल्या टेरर फंडिंगच्या एका प्रकरणात पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने त्याला लाहोरमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी सईदसह जमात-उद-दावाच्या अन्य 13 नेत्यांच्याविरुद्ध 23 खटले दाखल केले आहेत. खटले दाखल झाल्यानंतर या सर्वांच्या अटकेची कारवाई वेगाने करण्यात आली. सईद लाहोरहून गुजरांवालाकडे जात असताना दहशतवाद विरोधी विभागाने त्याला अटक केली.
भारताच्या दबावानंतर काही महिन्यांपूर्वी सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आले होते. त्याच्यावर 10 मिलियन अमेरिकन डॉलर्सचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. याच वर्षी सईदच्या जमात-उद-दावा या संघटनेकडून सुरु केलेले रावळपिंडी येथील रुग्णालय आणि मदरसा सील करण्यात आला होता. कोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड