JOIN US
मराठी बातम्या / देश / India Drugs Seized : भारतीय नौदलाची गुजरात आणि केरळमध्ये मोठी कारवाई, पाकिस्तानचा उधळला मोठा कट

India Drugs Seized : भारतीय नौदलाची गुजरात आणि केरळमध्ये मोठी कारवाई, पाकिस्तानचा उधळला मोठा कट

केरळच्या कोचीमध्ये आणि गुजरातमध्ये भारतीय नौदलाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 1 हजार 600 कोटींचे हिरोईन जप्त करण्यात आले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोची, 08 ऑक्टोंबर : केरळच्या कोचीमध्ये भारतीय नौदलाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 1 हजार 200 कोटींचे 200 किलोे हिरोईन जप्त करण्यात आले आहे. 6 इराणी लोक क्रू लोकांची संशयास्पद हालचाल सुरू असल्याचे समजताच भारतीय नौदलाकडून त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आले आहे. दरम्यान पाकिस्तानच्या बोटीतून हा माल समुद्राच्या मध्यभागी आणि इराणी बोटीत ठेवण्यात आला. दरम्यान यातील काही माल श्रीलंकेसाठी होता तर काही भाग भारतासाठी होता अशी माहिती एनसीबीचे अधिकारी एस के सिंग यांनी दिली.

एनसीबीचे अधिकारी एस के सिंग म्हणाले कि, क्रूसह ताब्यात घेतलेल्या 6 इराणी लोकांना आम्ही अटक केली आहे. दरम्यान त्यांच्याकेडे असलेल्या इतर साहित्य तपासासाठी आमच्याकडे सोपवण्यात आले आहे. एनसीबीला मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेला माल पाकिस्तानस्थित हादी सलीम नेटवर्कद्वारे पुरवली गेली होती. हादी सलीमने यापूर्वी हेरॉइन, चरस, मेथाम्फेटामाइन हे ड्रग्स भारत आणि हिंद महासागरातील इतर देशांना पुरवतो. याबाबत आमचा अधिक तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

जाहिरात

हे ही वाचा :  ‘पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट’, बॉम्बस्फोटाची धमकी, पुण्यात एकाला बेड्या

जाहिरात

या इराणींची झडती घेतल्यानंतर 3 स्मार्टफोन जप्त करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणतीही संशयास्पद वस्तू सापडल्या नाहीत. याचबरोबर त्यांचा अद्याप कोणत्याही दहशतवाद्याशी संबंध सापडलेला नाही. चौकशीदरम्यान, इराणच्या कोनारक भागातील असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. अशी माहिती डीडीजी, ओप्स, आणि एनसीबीचे प्रमुख अधिकारी संयज कुमार सिंग यांनी दिली. याबाबतचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात

गुजरातमध्येही मोठी कारवाई

भारतीय तटरक्षक दलाने ATS गुजरात सोबत संयुक्त कारवाई करत, आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ (IMBL) आज (दि.08) पहाटे, 6 क्रू मेंबर्स आणि 350 कोटींचे 50 किलो हेरॉइनसह पाकिस्तानी बोट अल सक्करला पकडल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान पुढील तपासासाठी बोट जखाऊ येथे आणण्यात येत आहे. ICG ने ATS सोबत केलेली ही 6वी कारवाई आहे, 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून सुमारे 200 कोटींचे 40 किलो हेरॉईन पकडण्यात आल्याची घटना ताजी असताना पुन्हा दुसरी घटना असल्याचे आयसीजीचे अधिकारी म्हणाले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या