JOIN US
मराठी बातम्या / देश / भारतात 9 लोकांना मिळतो 100 कोटींपेक्षा अधिक पगार!

भारतात 9 लोकांना मिळतो 100 कोटींपेक्षा अधिक पगार!

देशात 100 कोटी इतका पगार घेणारे लोक असल्याचे समोर आले आहे.

जाहिरात

शक्तीशाली करन्सीमध्ये तिसऱ्या स्थानावर जापानचे येन हे चलन आहे. जागतिक बाजारपेठेत करन्सीच्या रुपात येत 572 अब्ज डॉलरने उपलब्ध आहे. जगभरातील एकूण रिझर्व्हमध्ये 5.24 टक्के येनची भागीदारी आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: आयकर विभागाने 2017-18 या आर्थिक वर्षात झालेल्या आयटीआर डेटाचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून देशात 100 कोटी इतका पगार घेणारे लोक असल्याचे समोर आले आहे. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार भारतात 9 जण असे आहेत ज्यांना 100 कोटी इतका पगार मिळते. अर्थात 500 कोटी पगारा अद्याप कोणालाही मिळत नसल्यामुळे त्या क्लबमध्ये अद्याप कोणीही नाही. देशात इतका पगार अद्याप कोणालाही मिळत नाही. याशिवाय देशात असे 50 हजार लोक आहेत ज्यांना प्रत्येक वर्षाला 1 कोटी इतका पगार मिळतो. करदात्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी समोर आली आहे. काय म्हटल आयकर विभागाच्या अहवालात - देशातील 2.9 कोटी करदात्यांपैकी 81.5 लाख लोकांचा पगार हा 5.5 लाख ते 9.5 लाख इतका आहे - 10-15 लाख पगारात 22 लाखाहून अधिक लोक आहेत - 15-20 लाख पगार असलेल्यांची संख्या 7 लाखाहून अधिक आहे. तर 20-25 लाख पगार घेणाऱ्यांची संख्या 3.8 लाख इतकी आहे. - 25-50 लाख पगार असणाऱ्यांची संख्या 5 लाखाच्या आसपास आहे. तर 50 लाख ते 1 कोटी दरम्यान पगार घेणाऱ्यांची संख्या 1.2 लाख इतकी आहे. - एक कोटीपेक्षा अधिक पगार असलेल्यांची संख्या 49 हजार 128 इतकी आहे. त्यापैकी केवळ 9 जण असे आहेत ज्यांचा पगार 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. - 100- 500 कोटी पगार घेणाऱ्या सुपर रिच क्लबमध्ये 9 जण आहेत. ज्यांचा वर्षाचा पगार 128 कोटी इतका आहे. अर्थात सुरक्षेच्या कारणामुळे आयक विभागाने त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. - सर्व घटकांचा विचार करता देशातील करोडपतींच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाड होत ती आता 97 हजार 689 वर पोहोचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या