JOIN US
मराठी बातम्या / देश / चुकीची माहिती पसरवणारे 42 Social Media Handles मोदी सरकारने केले Block, पाकिस्तानातून पसरवत होते भारतद्वेष

चुकीची माहिती पसरवणारे 42 Social Media Handles मोदी सरकारने केले Block, पाकिस्तानातून पसरवत होते भारतद्वेष

पाकिस्तानातून भारताविरोधी द्वेष पसरवणाऱ्या सोशल मीडिया हँडल्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची कार्यपद्धती वाचून कुणालाही धक्का बसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 जानेवारी: भारताविषयी (India) गैरसमज (Misinformation) पसरवून अशांतता (Unrest) निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्सना (Social Media Handles) भारत सरकारच्या (Government of India) माहिती आणि प्रसारण खात्यानं (Information and Broadcast Ministry) ब्लॉक केलं (Blocked) आहे. भारतात लागू झालेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यांमधील तरतुदींचा आधार घेत सरकारनं ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे भारताविरोधी द्वेष पसरवण्याचं हे काम पाकिस्तानातून सुरू असल्याचंही स्पष्ट झालं आहे.  

संबंधित बातम्या

विविध हँडल्सवर कारवाई केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 35 यूट्यूब चॅनल्स, 2 इन्स्टाग्राम अकाउंट्स, 2 ट्विटर अकाउंट्स, 2 बेवसाईट्स आणि एका फेसबुक अकाउंटरव कारवाई करण्यात आली आहे. हे सर्वच्या सर्व प्लॅटफॉर्म भारत आणि भारतातील प्रश्न यांच्याबाबत गैरसमज पसरवत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची माहिती माहिती प्रसारण खात्याचे सहसचिव विक्रम साठे यांनी दिली आहे.   पाकिस्तानातून पसरवत होते भारतद्वेष कारवाई करण्यात आलेल्या सर्वच्या सर्व सोशल मीडिया हँडल्समध्ये एकच कॉमन बाब आढळली आहे. ती म्हणजे ही सर्व हँडल्स पाकिस्तानमधून ऑपरेट होत होती.पाकिस्तानातून याचा कंटेंट तयार केला जात होता आणि तो भारतात पसरवला जात होता. भारताविरोधात गैरसमज पसरवणे, जे घडलंच नाही अशा खोटया बातम्या प्रसारित करणे, ज्या गोष्टींमुळे धार्मिक विद्वेष वाढीस लागेल, असे संदेश पोस्ट करणे या प्रकारच्या कृती त्यांच्याकडून सातत्यानं होत असल्याच्या तक्रारी माहिती प्रसारण खात्याकडे आल्या होत्या. त्यांची शहानिशा केल्यानंतर या सर्व खात्यांचं पाकिस्तान कनेक्शन समोर आल्याचं साठे यांनी म्हटलं आहे.   हे वाचा -

कोट्यवधी प्रेक्षक आतापर्यंत या सर्व हँडल्सना मिळून 130 कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज आल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय लष्कर, जनरल बिपिन रावत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषय़ी सातत्यानं गैरसमज पसरवण्याचं काम या वेबसाईटवरून केलं जात होतं. यापूर्वीदेखील डिसेंबर महिन्यात 20 यूट्यूब चॅनल्स 2 वेबसाईट ब्लॉक करण्यात आल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या