JOIN US
मराठी बातम्या / देश / हसत्या खेळत्या कुटुंबाला कोरोनाची लागली नजर; पत्नीच्या निधनानंतर पतीनंही स्वत:ला संपवलं, चिमुकला अनाथ

हसत्या खेळत्या कुटुंबाला कोरोनाची लागली नजर; पत्नीच्या निधनानंतर पतीनंही स्वत:ला संपवलं, चिमुकला अनाथ

कोरोनामुळे पत्नीचं निधन झाल्याचं दु:ख सहन न झाल्यानं एका लोकप्रिय वकिलानं गोळी झाडून आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide by shooting himself) केला आहे.

जाहिरात

(प्रातिनिधीक फोटो-Shutterstock)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट: मागील पावणे दोन वर्षांपासून कोरोना विषाणूनं देशभर थैमान (Corona pandemic) घातलं आहे. दरम्यानच्या काळात अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमावलं (Corona patients death) आहे. आई वडिलांचं छत्र हरवल्यानं असंख्य चिमुकले निराधार झाली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अनाथचं जगणं जगण्याची वेळ आली आहे. अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कोरोनामुळे पत्नीचं निधन झाल्याचं दु:ख सहन न झाल्यानं एका लोकप्रिय वकिलानं गोळी झाडून आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide by shooting himself) केला आहे. आई आणि वडील दोघांचंही निधन झाल्यानं त्यांच्या मुलावर अनाथ होण्याची वेळ आली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील आहे. आनंद दुबे असं गोळी झाडून आत्महत्या केलेल्या वकिलाचं नाव आहे. होशंगाबाद परिसरात एक लोकप्रिय वकील म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या अचानक जाण्यानं अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मृत आनंद यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. बरेच दिवस रुग्णालयात उपचार घेऊनही कोरोनामुळे त्याचं निधन झालं. हेही वाचा- 47 किलो वजन कमी होऊनही कोरोनाला हरवलं; 122 दिवसांनी मृत्यूच्या दाढेतून सुटका पत्नीच्या निधनाचा जबरदस्त मानसिक धक्का आनंद यांना बसला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांचं कामावर देखील मन लागत नव्हत. ते हळूहळू नैराश्याच्या गर्तेत गेले. यातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी घरातील बंदुकीतून गोळी झाडून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अशाप्रकारे आनंद यांनी आत्महत्या केल्यानं काही दिवसांतच त्याचं हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त झालं आहे. आई आणि वडील दोघांचंही निधन झाल्यानं त्यांच्या मुलावर अनाथाचं जीवन जगण्याची वेळ आली आहे. हेही वाचा- Corona Update: देशात आठवडाभरात 32 टक्के रुग्णवाढ; गाठला दोन महिन्यातील उच्चांक या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला असता, त्यांना सुसाइड नोट मिळाली नाही. आत्महत्येसाठी काही वेगळंही कारण असू शकतं का ? याचा तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या