JOIN US
मराठी बातम्या / देश / केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्याचा अपघात, ताफ्यातल्या तीन गाड्या धडकल्या, 2 पोलीस कर्मचारी जखमी

केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्याचा अपघात, ताफ्यातल्या तीन गाड्या धडकल्या, 2 पोलीस कर्मचारी जखमी

केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला आहे. ताफ्यातील 3 वाहने एकमेकांवर आदळली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हिमाचल प्रदेश, 06 नोव्हेंबर: हिमाचल प्रदेशातील हमीरपूर (Hamirpur) जिल्ह्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Cabinet Minister Anurag Thakur) यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला आहे. ताफ्यातील 3 वाहने एकमेकांवर आदळली आहेत. या घटनेत दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनुराग ठाकूर शनिवारी आपल्या घरातून म्हणजेच हमीरपूरहून दिल्लीला (Delhi) रवाना झाले आहेत. यादरम्यान हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हमीरपूर येथील त्यांच्या घरी आले होते. यादरम्यान ते शनिवारी दिल्लीला परतणार होते. सकाळी 9 वाजता दिल्लीला निघाले असता सर्किट हाऊस हमीरपूरजवळ हा अपघात झाला.केंद्रीय मंत्री आणि त्यांचे कर्मचारी तसंच वाहन पूर्णपणे सुरक्षित आहेत. हेही वाचा-  Afghanistan:अमेरिकन सैनिकाच्या हाती सोपवलेला 2 महिन्यांचा सोहेल अजूनही बेपत्ता मंत्र्याच्या गाडीच्या चालकानं अचानक ब्रेक लावल्यानं मागून येणारी वाहने एकमेकांवर आदळली. जखमी पोलीस कर्मचार्‍यांना हमीरपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, चालकांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. हेही वाचा-  Raj Thackeray आजपासून राहणार नव्या घरात, हे असेल नव्या घराचं नाव अनुराग ठाकूर यांच्या गाडीचं कोणतंही नुकसान झालेले नाही. त्यानंतर केंद्रीय मंत्री घटनास्थळावरून निघून गेले. घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी पथकासह घटनास्थळी पोहोचले. वाहतूक प्रभारी पाल सिंह यांनी सांगितलं की, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या ताफ्यातील वाहनांची एकमेकांना धडकल्याची माहिती समोर आली आहे. गाडीसमोर एक प्राणी आल्यानंतर एका वाहन चालकानं अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची एकमेकांना धडक बसली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या