JOIN US
मराठी बातम्या / देश / आरोग्य अधिकाऱ्याकडून सहकारी महिलेचा लैंगिक छळ; जबरदस्ती फिरायला घेऊन गेला अन्...

आरोग्य अधिकाऱ्याकडून सहकारी महिलेचा लैंगिक छळ; जबरदस्ती फिरायला घेऊन गेला अन्...

Crime News: सरकारी आरोग्य अधिकाऱ्याने कार्यालयात सोबत काम करणाऱ्या महिलेसोबत लैंगिक चाळे (health officer molest female colleague) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मंगळुरू, 30 नोव्हेंबर: सरकारी आरोग्य अधिकाऱ्याने कार्यालयात सोबत काम करणाऱ्या महिलेसोबत लैंगिक चाळे (health officer molest female colleague) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आरोपी गेल्या बऱ्याच दिवसांपासून पीडित महिलेसोबत अश्लील कृत्य (Sexual molestation) करत होता. पण कार्यालयातील आरोपीचं पद लक्षात घेऊन कोणीही त्याचा विरोध करत नव्हतं. अखेर एका समाजिक कार्यकर्त्या महिलेला ऑफिसमध्ये सुरू असलेला प्रकार समजल्यानंतर, त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR lodged) केली आहे. शनिवारी पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrested) केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित घटना कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथील असून अटक केलेल्या आरोग्य अधिकाऱ्याचं नाव रत्नाकर असं आहे. आरोपी रत्नाकर हा कुष्ठरोग निर्मूलन शाखेत नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणी मंगळुरू महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रत्नाकर याचे कार्यालयात काम करणाऱ्या महिलेसोबत अश्लील चाळे करतानाचे फोटो आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. हेही वाचा- बर्थडेला नेलं अन् पत्नीला केलं मित्रांच्या हवाली, गँगरेपच्या घटनेनं हादरली मुंबई आरोपी अधिकाऱ्याच्या काळ्या कृत्यांना सहकार्य न केल्यास आरोपीकडून ऑफिसमधील महिलांना मुद्दाम टार्गेट केलं जात असल्याचा आरोप एका सहकारी महिलेनं केला आहे. तसेच आरोपी पीडित महिलेला जबरदस्ती फिरायला घेऊन गेला. फिरायला गेल्यानंतर त्याच्यासोबत फोटो काढताना ‘पोज’ देण्यासाठी दबाव टाकल्याचंही सहकारी महिलेनं सांगितलं आहे. हेही वाचा- ‘हत्या केली पण..’, कुर्ल्यातील तरुणीसोबत काय केलं? आरोपीनेच केला संतापजनक खुलासा महिला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पीडित महिलेशी संपर्क साधला असता, तिने कायदेशीर कारवाईत सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे. पण सुरक्षिततेचा धोका लक्षात घेऊन आपण आरोपीविरोधात फिर्याद दाखल करणार नाही, असं निर्णय पीडित महिलेनं घेतला आहे. कार्यालयातील सहकारी महिलेसोबत गैरवर्तन केल्यामुळे आरोपी आरोग्य अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या