JOIN US
मराठी बातम्या / देश / गँगवॉर भडकलं, सूर्या मराठी गँगच्या माणसाची तलवारीने हत्या CCTVमध्ये कैद

गँगवॉर भडकलं, सूर्या मराठी गँगच्या माणसाची तलवारीने हत्या CCTVमध्ये कैद

हा हल्ला किती भीषण होता हे त्या व्हिडीओत दिसून येतेय. डाह्या गँगचे सदस्य सपासप वार करत अतिशय क्रूरपणे मारताना दिसत आहेत . या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडालीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सूरत, 01 जानेवारी : गुजरातमधल्या सूरतमध्ये गँगवॉरचा भडका उडालाय. दोन टोळ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका टोळीच्या गुंडाची हत्या करण्यात आलीय. 5 जणांच्या टोळक्याने तलवार आणि चाकूने हल्ला करत त्याची हत्या केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या सर्व हल्ल्याचं CCTV फुटेज आता व्हायरल झालं असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सूरतमध्ये डाह्या गँग आणि सूर्या मराठी गँगची दहशत आहे. दोन्ही गँगचे गुंड कायम एकमेकांवर हल्ले करत माणसांना संपवत असातात. डाह्या गँगच्या सदस्यांनी सूर्या मराठी गँगच्या एका गुंडावर रात्री हल्ला केला. सूर्या गँगचे तीन गुंड रात्री एका गल्लीतून जात असताना डाह्या गँगच्या लोकांनी पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला केला. पाच जणांच्या टोळक्यांनी त्यांना घेरलं आणि जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तलवार आणि चाकूने हल्ला केला. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले होते. नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यातल्या एकाचा मृत्यू झाला. या आधी डाह्या गँगने सूर्या गँगवर हल्ल्याचा आरोप केला होता. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या भागतल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा हल्ला कैद झालाय. किती भीषण प्रकारे हा हल्ला करण्यात आला होता हे त्या व्हिडीओत दिसून येते. डाह्या गँगचे सदस्य सपासप वार करताना त्यात दिसून येतेयं. या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली असून सीसीटीव्हीचं फुटेज शोधून गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहिम सुरू केलाय.

गेल्या काही दिवसांपासून गँगवॉरने डोकं काढलं होतं. पोलिसही या टोळ्यांच्या हैदोसाने त्रासले होते. या दोन टोळ्यांशीवाय आणखीही काही टोळ्या कार्यरत असून खंडणी, अपहरण, खून अशी काम पैसे घेऊन करण्याचं काम त्या करत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या