कासगंज, 07 एप्रिल : कधी कधी काही विचित्र घटना घडतात. त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही. किंवा त्या कशामुळे घडल्या, हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा अगम्य घटनांना लोक घाबरतात. अशाच प्रकारची एक रहस्यमय घटना तीन सख्ख्या भावांसोबत घडली आहे. या तीन भावांच्या घरांमध्ये आगीची रहस्यमय घटना घडली आहे. काही ग्रामस्थ याला चमत्कार तर काही जण दैवी आपत्ती म्हणत आहेत. या घटनेमुळं केवळ हे तीन भाऊच नव्हेत तर, गावातल्या लोकांमध्येही घबराट पसरली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 1 एप्रिलपासून आजपर्यंत इथं तब्बल 300 वेळा आगीच्या घटना घडली आहे. या आगीच्या घटनांमुळे घाबरलेल्या तीन सख्ख्या भावांनी घरातील सर्व सामान बाहेर काढून रस्त्यावर ठेवलं आहे. घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासनाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. सध्या अग्निशमन दलाचं एक वाहनही तैनात करण्यात आलं आहे. त्याचबरोबर बुधवारपासून घरात सतत भजन कीर्तन सुरू असल्यानं थोडा दिलासा मिळाल्याचे लोक सांगत आहेत. रूप सिंह, कन्हैया पाल आणि विजेंदर सिंह अशी या तीन भावांची नावं आहेत. ते उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील सोरॉन डेव्हलपमेंट ब्लॉक भागातील रायपूर पटना गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या घरात रहस्यमय आगीची (Kasganj Fire Accident) घटना घडली आहे. हे तिघेही एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. तिन्ही भावांच्या घरांच्या मधोमध भगवान भोलेनाथाचं मंदिरही आहे. गेल्या सहा दिवसांत त्यांच्या घरांना अनेकदा आग लागली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घरात वारंवार लागणाऱ्या आगींमुळे त्रस्त झालेल्या या तिन्ही भावांनी आपापल्या घरातील संसारोपयोगी साहित्य बाहेर काढून रस्त्यावर टाकलं आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं पोहोचत आहेत. त्याचबरोबर गावातील लोक याला दैवी आपत्ती मानत आहेत. तर, काही लोक याला पितृदोष म्हणत आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल तैनात या प्रकरणाबाबत न्यूज18 टीम जेव्हा रायपूर पाटणा गावात पोहोचली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनीही सांगितले की, इथं ज्या पद्धतीने आग लागली आहे, तसा प्रकार त्यांनी त्यांच्या 32 वर्षांच्या सेवेत कधीही पाहिला नाही. तिन्ही भावांची वेगळी घरं असून अशा घटना तिघांच्याही घरात घडत आहेत. त्यात घरातील जवळपास सर्व कपडे जळाल्याचे ते सांगण्यात येत आहे. याशिवाय लाकडी फळ्या, गहूही जळाला आहे. एवढंच नाही तर, गावाबाहेर लावलेल्या ट्यूबवेलवरील खोलीला अचानक आग लागली. त्यामुळे कुटुंबासह गावातील लोकही घाबरले आहेत. हे वाचा - अशा पद्धतीनं भारतातही होऊ शकते वीजनिर्मिती, आनंद महिंद्रांनी शेअर केला Video 1 एप्रिल रोजी अचानक आग लागली आणि त्यानंतर… न्यूज18 ने कुटुंबातील सदस्य गोविंद यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की, 1 एप्रिलपासून घरात सतत छोट्या-छोट्या ठिकाणी आग लागली आहे, ज्यामध्ये बेड आणि बॉक्सच्या आत अचानक आग लागली. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अचानक लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. एवढंच नाही तर, अचानक लागलेल्या आगीमुळे एका तरुण आणि एका महिलेचे हातही भाजले आहेत. या घटनेनंतर अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी तैनात करण्यात आलं असून त्यामुळे मोठी दुर्घटना टळू शकेल. हे वाचा - देशात 21 ग्रीनफिल्ड एअरपोर्ट्स होणार, जाणून घ्या कुठे असतील हे नवे विमानतळ याच कुटुंबातील सदस्य कन्हैया लाल यांनी सांगितलं की, आगीची घटना सुरू झाल्यापासून ही प्रक्रिया सातत्याने सुरू आहे आणि आतापर्यंत सुमारे तीनशे वेळा आगीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे कुटुंबातील आणि गावातील लोक घाबरले. प्रशासनाचे लोकही आले असून अग्निशमन दलाचे अग्निशमन दलाचे वाहन इथेच उभे करण्यात आले आहे. त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेले लेखपाल अनार सिंह यांनी सांगितलं की, मी आलो तेव्हापासून आतापर्यंत सात आगी लागल्या आहेत. आतापर्यंत ही घटना सुमारे 300 वेळा घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.