JOIN US
मराठी बातम्या / देश / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता करतोय पायी प्रवास, भेटण्यासाठी 815 किमी श्रीनगर ते दिल्ली निघाला पायी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता करतोय पायी प्रवास, भेटण्यासाठी 815 किमी श्रीनगर ते दिल्ली निघाला पायी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेण्याचा आणि त्यांना भेटण्याची संधी मिळवण्याचा उद्देश आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उधमपूर (जम्मू-काश्मीर), 23 ऑगस्ट: 2014 पासून पंतप्रधानपदी विराजमान असणारे भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या कर्तृत्वाने देशातील सर्वसामान्य जनतेला प्रभावित केलं आहे. जनतेचा प्रधान सेवक असल्याच्या भूमिकेतून लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत. कणखर नेतृत्व असलेल्या मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध घेतलेली कठोर भूमिका, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी केलेली लष्करी कारवाई तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची उदयोन्मुख महासत्ता अशी निर्माण केलेली प्रतिमा, देशात रोजगार निर्मितीसाठी राबवलेली मेक इन इंडिया, मेड इन इंडिया धोरणे यासह सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याची कला अशा अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही जगातील सर्वांत प्रभावी आणि लोकप्रिय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा बाळगून जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) त्यांचे चाहते (Fan) फहीम नजीर शाह (Fahim Nazir Shah) चक्क पायी (Walking to Delhi) दिल्लीला निघाले आहेत. श्रीनगर (Srinagar) ते दिल्ली (Delhi) हे 815 किमीचे अंतर पायी पार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेण्याचा आणि त्यांना भेटण्याची संधी मिळवण्याचा उद्देश आहे. श्रीनगरमधील शालीमार भागात राहणारे 28 वर्षीय फहीम नजीर शाह इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यांचे ते कट्टर चाहते आहेत. पंतप्रधानांना भेटणे हे त्यांचे सर्वांत मोठे स्वप्न आहे. गेली चार वर्षे ते मोदी यांना सोशल मीडियावर (Social Media) फॉलो करत असून, त्यांची भाषणे आणि कृती यांनी आपल्यावर प्रचंड प्रभाव टाकल्याचं फहीम सांगतात. मोदी यांनी आपल्या हृदयात स्थान मिळवल्याचं ते म्हणतात. पंतप्रधानांना भेटण्यासाठी त्यांनी या पूर्वीही प्रयत्न केले होते, पण त्यात यश आलं नाही. श्रीनगर ते दिल्ली या आपल्या पायी यात्रेत 200 किलोमीटरहून अधिक अंतर पार करून फहीम शहा रविवारी उधमपूरला (Udhampur) पोहोचले. दोन दिवसात त्यांनी हे अंतर पार केलं आहे.

‘लेडी तालिबान पाहायचं असेल तर कालीघाटमध्ये या’; भाजप नेत्याची ममता बॅनर्जींवर जहरी टीका

 या वेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते होण्यामागची घटना सांगितली. ते म्हणाले, ‘एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी रॅलीमध्ये भाषण देत होते, मात्र ‘अज़ान’ ऐकल्यानंतर ते अचानक थांबले. त्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले. पंतप्रधानांच्या या छोट्याशा पण महत्त्वपूर्ण कृतीनं माझं मन जिंकलं आणि मी त्यांचा चाहता बनलो.

जम्मू -काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून 2019 मध्ये केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर तिथं झालेल्या बदलांविषयी शहा यांना त्यांचे मत विचारले असता, पंतप्रधान मोदी यांचे जम्मू -काश्मीरवर विशेष लक्ष असल्यानं हा बदल झाला आहे आणि या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासास चालना मिळाली आहे, असं शहा यांनी सांगितलं.

बांगड्या विकणाऱ्या तरुणाच्या मारहाणीनंतर वाद पेटला, काँग्रेस नेत्याने शेअर केला VIDEO

संबंधित बातम्या

या वेळी पंतप्रधानांना भेटण्याचे त्यांचे स्वप्न नक्की पूर्ण होईल, असा विश्वास त्यांना आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांविषयी अत्यंत सजग असलेले त्यांची दखल घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शहा यांना वेळ देतात का आणि शहा यांचे स्वप्न पूर्ण होते का, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या