नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्यानंतर आता काँग्रेस पक्षाला आणखी मोठा धक्का बसला आहे. अंमलबजावणी संचलनालयाने पक्षाचे ज्येष्ठ नेते डी.के.शिवकुमार यांना अटक केली आहे. गेल्या चार दिवसांपासून शिवकुमार यांची चौकशी सुरु होती. मनी लॉन्ड्रिंग ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. अटक करण्याआधी शुक्रवारी त्यांची 4 तास तर शनिवारी 8 तास चौकशी करण्यात आली होती. काँग्रेस पक्षात शिवकुमार यांची ओळख चाणक्य अशी केली जाते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटचे माजी कॅबिनेट मंत्री धनशोधन यांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. विद्यमान आमदार शिवकुमार 30 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा ईडीसमोर हजर झाले होते. या चौकशीसाठी ते बेंगळुरूवरून दिल्लीत आले होते आणि त्यांनी चौकशीत सहकार्य करणार असल्याचे देखील सांगितले होते. चौकशी आधी ईडीच्या समन्सला आव्हान देणारी याचिका शिवकुमार यांनी दाखल केली होती. पण कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले होते. दरम्यान, शिवकुमार यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 2017च्या गुजरातच्या राज्यसभेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे राजकीय हेतूने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ईडीने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात शिवकुमार आणि दिल्लीतील कर्नाटक भवनमधील एका अधिकाऱ्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण आयकर विभागाद्वारे शिवकुमार यांनी गेल्या वर्षी दाखल केलेल्या गुन्हाच्या आधारावर आहे. बेंगळूरूतील एका विशेष न्यायालयात हा खटला सुरू असून शिवकुमार यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप आहे.
VIDEO : प्रेम करण्याची शिक्षा, तरुणीला अर्धनग्न करून रस्त्यावर बेदम मारहाण