JOIN US
मराठी बातम्या / देश / 'उद्घाटनाला मुख्यमंत्री असावे असं थोडी', नारायण राणेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं

'उद्घाटनाला मुख्यमंत्री असावे असं थोडी', नारायण राणेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं

बहुचर्चित चिपी विमानतळाच्या (chipi airport sindhudurg ) उद्घाटनावरून आता शिवसेना (shivsena) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्यात वाद पेटला आहे.

जाहिरात

कोर्टाने दिलेल्या आदेश आणि अटीनुसार, अखेर आज नारायण राणे हे अलिबाग पोलीस स्टेशनला (alibag police station) हजर झाले होते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या (chipi airport sindhudurg ) उद्घाटनावरून आता शिवसेना (shivsena) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्यात वाद पेटला आहे. सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी 7 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता, उद्घाटनाला मुख्यमंत्रीच असावा असं काही नसतं, असं म्हणत नव्या वादाचे संकेत दिले आहे. नारायण राणे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला. ‘येत्या 9 ऑक्टोंबर रोजी चीपी विमानतळावरून विमान वाहतूक सुरू होणार आहे. गेल्या 7 वर्षांपासून विमानतळ बाधून तयार होते. आज सकाळी ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटलो त्यावेळी हा निर्णय झाला आहे’, अशी माहिती राणेंनी दिली. कपडे वाळत घालत असताना 8 व्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू, पुण्यातील घटना तसंच, सिंधुदुर्ग ते मुंबई विमान सेवा सुरू होणार आहे. स्थानिक असल्यामुळे आणि हे विमानतळ बांधले आहे. त्यामुळे असं काही नाही की, उद्घाटनला फक्त मुख्यमंत्री पाहिजे म्हणून अमुक एक व्यक्ती पाहिजे, असं म्हणत राणेंनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसंच, कोकणात कोणता एक प्रकल्प जाहीर केला आहे, हे शिवसेनेने सांगावे. मुळात शिवसेना कुठलेच काम करीत नाही ते फक्त कामं बंद करण्याचे काम करीत असतात. आणि जे आमच्यावर दगड मारतात त्यांचा सत्कार करतात, हे कसले मुख्यमंत्री आहे, असा टोलाही राणेंनी लगावला. तसंच, ठाकरे सरकारने हिंदू सणांवर बंदी आणण्याचे काम केले आहे. गणेशोत्वात अनेक बंधनं घातली आहे मुळात मुर्तीची उंची वाढल्याने कोरोना वाढतो का ? यांचे उत्तर आहे का? असा सवालही राणेंनी विचारला. ….मग RSS च्या प्रमुखपदी सरसंघचालक म्हणून मुस्लीम व्यक्तीला बसवणार का?' दरम्यान, 7 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन करावे या संबंधी तयारी करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभा खासदार विनायक राऊत यांनी भेट घेऊन निवेदन दिले. सोबत परिवहन मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब तसेच शिवसेना सचिव - खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या