जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / लेकाच्या घरी आईचा दुर्दैवी मृत्यू, कपडे वाळू घालत असताना 8 व्या मजल्यावरून कोसळली महिला!

लेकाच्या घरी आईचा दुर्दैवी मृत्यू, कपडे वाळू घालत असताना 8 व्या मजल्यावरून कोसळली महिला!

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

कपडे वाळू घालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 07 सप्टेंबर : आठव्या मजल्यावर असलेल्या घराच्या गॅलरीत कपडे वाळू घालत असताना एका 50 वर्षीय महिलेचा तोल जावून मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील (pune) आंबेगावात घडली आहे. मुलाला भेटण्यासाठी आलेल्या या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्यातील आंबेगाव (pune ambegaon )  खुर्दमधील दत्तनगर भागात असलेल्या बहुमजली लेकवुड (lakewood society ambegaon) या नामांकित सोसायटीत ही घटना घडली.  केसरीदेवी हरिजी सिंग (वय 55) असं या मृत महिलेचं नाव आहे. IND vs ENG : बकवास बंद करा, टीम इंडियाच्या विजयानंतर भारतीय चाहत्यांवर भडकला एबी सिंग कुटुंबीय हे मुळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे. पुण्यात त्यांच्या मुलाचे लेकवुड सोसायटीत आठव्या मजल्यावर घर आहे. त्यांचा मुलगा आणि सून पुण्यात नोकरी करतात. त्यामुळे त्या आपल्याला मुलाला भेटण्यासाठी आल्या होत्या. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या कपडे वाळू घालण्यासाठी गॅलरीत गेल्या होत्या. पण, कपडे वाळू घालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्या. अचानक झालेल्या या घटनेमुळे सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. काय सांगता? कोरोना होऊन गेलेल्यांना लस घेण्याची गरजच नाही? जाणून घ्या सविस्तर केसरीदेवी यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून या प्रकरणी नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune , pune news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात