JOIN US
मराठी बातम्या / देश / प्रियकरानं Video Call वरून दिलं हत्येचं ट्रेनिंग; लेकीनं जन्मदात्या आईचाच काढला काटा

प्रियकरानं Video Call वरून दिलं हत्येचं ट्रेनिंग; लेकीनं जन्मदात्या आईचाच काढला काटा

Murder News: एका 16 वर्षीय मुलीनं आपल्या आईची हत्या (Daughter Killed Mother) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानं पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फरीदाबाद, 08 ऑगस्ट: एका 16 वर्षीय मुलीनं आपल्या आईची हत्या (Daughter Killed Mother) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 जुलै रोजी हत्या झाल्यानंतर पोलिसांनी जवळपास एक महिन्यांनी हत्येचं गूढ (Murder Mystery) उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीसह तिच्या प्रियकराला अटक (Accused daughter and her boyfriend arrest) केली आहे. या प्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केलं असताना, न्यायालयानं आरोपी प्रियकराला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. तर आरोपी मुलगी अल्पवयीन असल्यानं तिची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील फरीदाबाद येथील आहे. तर आरोपीचं नाव दीपांशू असून तो बुलंदशहरचा रहिवासी आहे. आरोपी दीपांशूचं मागील काही काळापासून 16 वर्षीय आरोपी मुलीशी प्रेमसंबंध सुरू होते. दोघांत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती आरोपी मुलीच्या आईला कळाली होती. त्यामुळे आरोपी मुलीनं आपल्याला दीपांशूशी लग्न करायचं असल्याचं सांगितलं. पण आईनं लग्नाला नकार दिला, शिवाय तिचं सुरू असलेलं प्रेमसंबंध तोडायला सांगितलं. यामुळे मुलीचा आईवर रोष होता. यातूनच मुलीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं जन्मदात्या आईची हत्या केली आहे. हेही वाचा- पुणे: मेडिकलमधून कंडोम आणून न दिल्यानं तरुणाची सटकली; अल्पवयीन मुलावर चाकूनं वार प्रियकरानं व्हिडीओ कॉलवरून सांगितली हत्येची पद्धत प्रेमसंबंधात अडथळा बनत असल्यानं मुलीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्या आईच्या हत्येचा कट रचला. आरोपी मुलीनं लिंबू शरबतामधून आपल्या आईला झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस दिला होता. त्यानंतर आरोपी प्रियकराने व्हिडीओ कॉल वरून हत्या कशी करायची याबद्दलच्या सुचना मुलीला दिल्या. त्यानुसार आरोपी मुलीनं आपल्या आईची हत्या केली. हेही वाचा- कहर! केवळ हुक्की आली म्हणून केला अंदाधुंद गोळीबार! दोन ठार, गावात दहशत नेमकी हत्या कशी केली आरोपी प्रियकाराने सांगितल्यानुसार, आरोपी मुलीनं आपल्या बेशुद्ध आईचं तोंड उशी ठेवून दाबलं. त्यानंतर ओढणीनं आईचा गळा आवळला. 10 जुलै रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास मुलीनं आईची हत्या केल्यानंतर, 11 जुलै रोजी सकाळी डबुआ पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या मुलानं फिर्याद दाखल केली. तेव्हापासून संबंधित महिलेचं निधन कसं झालं याबाबत गूढ बनलं होतं. हत्येचा कसून तपास केल्यानंतर संशयाची सुई मुलीकडे वळली. यानंतर पोलिसांनी आरोपी मुलीसह तिच्या प्रियकराला अटक केली. पोलीस चौकशीदरम्यान पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या