JOIN US
मराठी बातम्या / देश / CDS बिपिन रावत यांचं निधन; पार्थिवासंदर्भातले अपडेट्स, असा असेल अंत्ययात्रेचा प्रवास

CDS बिपिन रावत यांचं निधन; पार्थिवासंदर्भातले अपडेट्स, असा असेल अंत्ययात्रेचा प्रवास

लष्करी हेलिकॉप्टर अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात माहिती देणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 डिसेंबर: तामिळनाडूतील (Tamilnadu Chopper Crash)कुन्नूरजवळ लष्करी हेलिकॉप्टर अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात माहिती देणार आहेत. या अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव गुरुवारी संध्याकाळपर्यंत लष्करी विमानाने दिल्लीला पोहोचण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. अंत्ययात्रा कामराज मार्गापासून सुरू होईल आणि ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीपर्यंत जाईल. हेही वाचा-  रावत कुटुंबाचं सैन्यदलाशी जन्माचं नात, पत्नीचाही जिव्हाळ्याचा संबंध, दोन मुलींवर दु:खाचा डोंगर रावत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते.वेलिंग्टनला पोहोचण्याच्या काही मिनिटांपूर्वीच हेलिकॉप्टरचा अपघात झाला. तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जणांचा मृत्यू झाल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले. वायुसेना आणि इतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर धुक्यामुळे कोसळलं असण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये विमानातील 13 जणांचा मृत्यू झाला, तर बचावलेल्या एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसंच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या निधनाबद्दल त्यांच्या योगदानाचे कौतुकही केलं. हेही वाचा-  IAF Helicopter Crash: तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचं निधन

 बिपिन रावत यांच्या आकस्मिक निधनाबद्दल उत्तराखंड सरकारने 9 डिसेंबरपासून तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकर्त्यांना गुरुवारी आपला वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे.

हेलिकॉप्टर अपघातानंतर बुधवारी सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा आणि कॅबिनेट सचिव राजीव गौबा या बैठकीला उपस्थित होते. ज्यामध्ये CCS सदस्यांना या दुःखद घटनेबद्दल माहिती देण्यात आली. जनरल रावत यांच्या निधनाबद्दल अमेरिका, रशिया, चीन आणि पाकिस्तानने शोक व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या