जयपूर 21 ऑगस्ट : राजस्थानमधील भाजप नेते ज्ञानदेव आहुजा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणत आहे की, ‘आम्ही तर यांच्या पाच लोकांना मारलं आहे, पण पहिल्यांदाच या लोकांनी आमच्या एका व्यक्तीची हत्या केली आहे’. उदयपूरमध्ये कन्हैय्या लालचा शिरच्छेद झाल्याच्या घटनेचा आहुजा उल्लेख करत होते, असं सांगण्यात येत आहे. पुतिन यांचा ‘ब्रेन’ समजल्या जाणाऱ्या अलेक्झांडर दुगिन यांच्या हत्येचा कट, कार स्फोटात मुलीचा मृत्यू ते असंही म्हणाले की मी माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण सूट दिली आहे. मी त्यांना जामीन मिळवून देण्याचं आश्वासनही दिलं आहे. आहुजा यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह दोतसरा यांनी आहुजांचा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिलं की, ‘भाजप किती जातीयवादी आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओशिवाय दुसरं काही दाखवण्याची गरज नाही.
पश्चिम बंगालमधील टीएमसी नेते आणि खासदार महुआ मोईत्रा यांनीही ज्ञानदेव आहुजा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ‘मिशी असलेला हा भाजपचा राक्षस 5 जणांना बेदम मारहाण करून जीव घेतल्याचा दावा करत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना या लोकांना मारण्याची सूट दिली आहे’. ते पुढे म्हणाले की, जर वाईटाचा खरंच चेहरा असता तर तो अगदी असाच असता. CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी साताऱ्यातील आपल्या गावासाठी एका झटक्यात तब्बल 450 कोटींच्या पुलांना दिली मंजूरी यापूर्वी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर आहुजा चर्चेत आले होते. बडोदामेव पोलीस स्टेशन हद्दीतील मीनाबास येथे एका 8 वर्षीय तरुणीला दुचाकीने धडक दिल्याने लोकांनी दुचाकीस्वार युवक योगेश जाटव याला बेदम मारहाण केली होती, ज्यात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आहुजा यांचं वक्तव्य आलं आहे. रामगडचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ज्ञानदेव आहुजा यांनी एका विशिष्ट समुदायाच्या लोकांवर लिंचिंग (मॉब लिंचिंग) केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध मॉब लिंचिंगचे कलमही लावले जावे, असे आहुजा म्हणाले होते. ज्ञानदेव आहुजा यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत पीडिताला नुकसान भरपाई आणि कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली होती.