JOIN US
मराठी बातम्या / देश / बटन दाबल्यावर दरवाजा उघडला पण आत लिफ्टच नव्हती.., इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासोबत घडलं भयानक

बटन दाबल्यावर दरवाजा उघडला पण आत लिफ्टच नव्हती.., इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासोबत घडलं भयानक

लिफ्टची वाट पाहणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने लिफ्टचा दरवाजा उघडल्यावर त्यात लिफ्ट नसेल याची कल्पनाही केली नव्हती. यामुळे लिफ्टमध्ये पाऊल टाकताच कुशाग्र मिश्रा थेट अकराव्या मजल्याहून खाली पडला आणि…

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर 04 ऑक्टोबर : कोणीतरी लिफ्टचं बटण दाबलं आणि दरवाजा उघडला पण त्यात लिफ्टच नसेल तर? असा विचारही आपल्या कधी डोक्यात येतो का? की असं काही घडलं तर त्यानंतर पुढे काय होणार! जयपूरमधील अशाच एका विचित्र आणि भीषण अपघाताने लोकांना हादरवून सोडलं आहे. जिथे एका सोसायटीच्या 11व्या मजल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला पण त्यात लिफ्टच नव्हती. यानंतर पुढे जे घडलं ते भयानक होतं. सातवीतील विद्यार्थीनीने घेतली शाळेच्या छतावरुन उडी; मुंबईतील खळबळजनक घटना लिफ्टची वाट पाहणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने लिफ्टचा दरवाजा उघडल्यावर त्यात लिफ्ट नसेल याची कल्पनाही केली नव्हती. यामुळे लिफ्टमध्ये पाऊल टाकताच कुशाग्र मिश्रा थेट अकराव्या मजल्याहून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. कुशाग्र मिश्रा हा मणिपाल विद्यापीठाचा अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी होता. जयपूरच्या रहिवासी सोसायटीत घडलेल्या या अपघाताने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अखेर असं कसं झालं की ही लिफ्ट वर आली, त्याचा दरवाजाही उघडला पण आतमध्ये लिफ्टच नव्हती. यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला या सोसायटीच्या अकराव्या मजल्यावर कुशाग्र मिश्रा भाड्याने राहत होता. या अपघातावेळी त्याचे मित्रही त्याच्यासोबत होते. मात्र, ते थोडे मागे राहिले होते, अन्यथा त्यांचाही जीव जाऊ शकत होता. कुशाग्रला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याचा मृत्यू झाला. दारूच्या व्यसनाने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त; एका निष्काळजीपणामुळे 27 जणांचा गेला जीव ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी सोसायटीच्या व्यवस्थापनाविरोधात निदर्शने केली. मणिपाल विद्यापीठाचे विद्यार्थीही या सोसायटीत मोठ्या संख्येने राहतात. सोसायटीचे व्यवस्थापन त्यांच्याकडून देखभालीच्या नावाखाली पैसे वसूल करतात, मात्र लिफ्टसारख्या महत्त्वाच्या गोष्टींची योग्य ती काळजीही घेत नाहीत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या एका मित्राचा मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या