JOIN US
मराठी बातम्या / देश / बर्फ नाही हा विषारी फेस आहे! याच पाण्यात छठ पूजेसाठी भाविक मारत आहेत डुबकी पाहा VIDEO

बर्फ नाही हा विषारी फेस आहे! याच पाण्यात छठ पूजेसाठी भाविक मारत आहेत डुबकी पाहा VIDEO

छठपूजेवेळी एक विदारक चित्र यमुना नदीत दिसून आलं आहे. प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या या विषारी फेसातच स्त्रिया पवित्र अंघोळ करत आहे. पाहा video

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : दिवाळीनंतर आता छठपूजा (Chhath Puja) पर्व सुरू झालं आहे. उत्तर भारतीयांसाठी (North India) हे पर्व अत्यंत महत्त्वाचं असतं. दिवाळीनंतर 6 दिवसांनी येणाऱ्या सहाव्या तिथीला म्हणजेच षष्ठीला छठ पर्व साजरं केलं जातं. या पर्वाच्या पहिल्या दिवशी स्नानाला (Bath) विशेष महत्त्व असतं. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यांमध्ये छठपूजा केली जाते. राजधानी दिल्लीत मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहानं हे पर्व साजरं केलं जात आहे. यमुना नदीत स्नान करण्यासाठी विविध घाटांवर भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत हवा प्रदूषण (Air Pollution) वाढलं आहे. परंतु, त्याच बरोबर छठपूजेवेळी एक विदारक चित्र यमुना नदीत दिसून आलं आहे. वायुप्रदूषणासोबतच जलप्रदूषण (Water Pollution) वाढल्यानं यमुना नदीच्या पाण्यावर विषारी फेसाळ थर (Toxic Foam Layer) अर्थात तवंग पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात छठपूजा पर्वाला विशेष महत्त्व असतं. आजपासून (8 नोव्हेंबर) हे पर्व सुरू झालं आहे. खरं तर हे पर्व 4 दिवस साजरं केलं जातं. यात पहिल्या दिवशी स्नान, दुसऱ्या दिवशी खरना, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अनुक्रमे सूर्यास्त आणि सूर्योदयावेळी नदी किंवा तलावात उभं राहून अर्घ्य दिलं जातं. परंपरेनुसार पर्वाच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील यमुना नदीकाठी स्नानासाठी लोकांची गर्दी दिसून येत आहे. परंतु, याचदरम्यान विविध घाटांवरील चिंताजनक स्थितीची छायाचित्रे पाहायला मिळत आहेत. VIDEO: पंतप्रधान झाल्यास सर्वात आधी कोणता निर्णय घ्याल? ऐका राहुल गांधींचं उत्तर एकीकडे दिल्लीवासीय वाढत्या हवा प्रदूषणाला तोंड देत असताना आता यमुना नदीतील पाणीदेखील प्रदूषित झाल्याचं दिसून येत आहे. यमुना नदीत विषारी फेस आणि गाळ साचला असून, अशा पाण्यातच श्रद्धाळू भाविक छठ पूजेनिमित्त स्नान करताना दिसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं (DDMA) यमुना नदीकाठी छठपूजेस परवानगी दिलेली नाही यमुना नदीतल्या प्रदूषित पाण्यात श्रद्धाळू भाविक स्थान करत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर राजकारण सुरू झालं आहे.

संबंधित बातम्या

भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केजरीवाल सरकारवर टीका करताना याच कारणामुळे यमुना नदीकाठी छठ पूजा करण्यास मनाई करण्यात आली होती, असं म्हटलं आहे. दक्षिण भारतात पावसाचं थैमान; महाराष्ट्रावर दुहेरी संकट, काय असेल पुण्यात हवामान? ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कालिंदी कुंज भागात यमुना नदीत विषारी फेस पसरल्याचं दिसून आलं आहे; मात्र अशा पाण्यात भाविक स्नान करताना दिसून येत आहेत. शेजारील राज्यांमध्ये पिकांचे अवशेष जाळले गेल्यानं आणि दिवाळीतल्या फटाक्यांच्या (Firecrackers) आतषबाजीमुळे राजधानी दिल्लीतली हवा प्रदूषित झाली आहे. यमुना नदीतल्या पाण्यात अमोनियाची पातळी वाढली आहे. त्यामुळे असा फेस किंवा तवंग तयार झाला आहे. अमोनियाची (Ammonia) पातळी वाढल्यानं पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या