JOIN US
मराठी बातम्या / देश / 39 दिवसांचा संसार एका फोननं तुटला, पतीला बेडरूममध्ये लॉक करून 7व्या मजल्यावरून पत्नीनं मारली उडी

39 दिवसांचा संसार एका फोननं तुटला, पतीला बेडरूममध्ये लॉक करून 7व्या मजल्यावरून पत्नीनं मारली उडी

चौकशीदरम्यान काही दिवसांपासून महिलेला ब्लॅकमेलिंगचे फोन येत असल्याचे आढळून आले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्तीसगड, 18 नोव्हेंबर : छत्तीसगडमध्ये एका नर्सनं 7व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आत्महत्येआधी 25 वर्षीय नर्सनं आपल्या डॉक्टर पतीला बेडरूममध्ये बंद केले होते. 39 दिवसांआधीच त्यांचे लग्न झाले होते. चौकशीदरम्यान काही दिवसांपासून महिलेला ब्लॅकमेलिंगचे फोन येत असल्याचे आढळून आले आहे. रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास महिला नर्स प्रीती देवानन यांचा मृतदेह इमारतीच्या मागील बाजूस आढळला. प्रीतीने तिच्या पती महेंद्र देवानंगनला बेडरूममध्ये बंद करून इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारुन जीव दिला. या दोघांनी 39 दिवसांपूर्वी कोर्टात जाऊन लग्न केले होते. एका वर्षापूर्वी या दोघांची ओळख खासगी रुग्णालयात झाली. यानंतर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. या घटनेने त्याचे संपूर्ण कुटुंब चकित झाले आहे. आत्महत्येचे खरे कारण कोणालाही माहिती नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. वाचा- साखरझोपेत असतानाच झाला सिलेंडरचा भयंकर स्फोट, पत्त्याप्रमाणे अख्खी इमारत कोसळली प्रीतीचे पती डॉ. महेंद्र देवानन यांनी पोलिसांना सांगितले की, रात्री 9.30 च्या सुमारास दोघांनी एकत्र जेवण केले. पत्नी तणावात असल्याचे त्यांना जाणवले. रात्रीचे जेवण झाल्यावर तो बेडरूममध्ये झोपायला गेला. यावेळी पत्नीनं बाहेरून दरवाजा बंद केला. पत्नीला फोन केल्यानंतर ती फोन उचलत नसल्याचे महेंद्र यांनी सांगितले. त्यानंतर, महेंद्र यांनी शेजाऱ्यांना बोलवलं. महेंद प्रीतीला शोधण्यासाठी टेरेसवर गेले, तेव्हा त्यांना प्रीतीचा मृतदेह दिसला. वाचा- पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला, आता अशी अवस्था झाली की… डॉ. महेंद्र यांनीही पोलिसांना सांगितले आहे की प्रीतीला ब्लॅकमेल मेसेजे आणि कॉल गेल्या काही दिवसांपासून येत होते. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. वाचा- पतीच्या मृत्यूचा धक्का सहन करू शकली नाही; स्टेटसवर अलविदा लिहून आवळला दुपट्टा पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या दोघांनी 8 ऑक्टोबर रोजी कोर्टात लग्न केल्याचे समजते. प्रीतीचे हा दुसरा विवाह होता. पहिल्या लग्नातून प्रीतीला 6 वर्षांची मुलगी आहे. महेंद्रने पोलिसांना सांगितले की सुमारे एक वर्षापूर्वी तो एका खासगी रुग्णालयात असताना त्यांची प्रीतीशी ओळख झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या