नवी दिल्ली, 4 जानेवारी : संपूर्ण देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता सरकारकडून निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता केंद्र सरकारने (Central Government) त्यांच्या कार्यालयांसाठी नवीन कोरोना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार आता कार्यालयात सचिव दर्जाच्या खालील पदांवर काम करणाऱ्यांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या संसर्गाची देशात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी हा आकडा 1700 हून अधिक झाला आहे. यामुळेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यासोबतच सर्वच राज्य सरकारांनाही त्याच पद्धतीने योग्य ती पावले उचलण्यास सांगितले आहे. वाचा : “…तर मुंबईत लॉकडाऊन लावणार” मुंबई मनपा आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं अशा आहेत केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय मंत्रालयाच्या सूचनेनुसार, आता अवर सचिवांच्या खाली असलेल्या पदांवरील 50 टक्के कर्मचारी पुढील आदेशापर्यंत वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करु शकतील. दिव्यांग आणि गरोदर महिला कर्मचाऱ्यंना कार्यालयात येण्याची घरज भासणार नाही. त्यांना घरून काम करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कार्यालयांचंया वेळा सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 आणि सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 अशा दोन वेळेत विभागण्यात आल्या आहेत. जेणेकरुन ये-जा करताना कर्मचाऱ्यांची गर्दी होणार नाही. कोविड संसर्ग अधिक असलेल्या म्हणजेच कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची गरज नाही. या भागात राहणारे कर्मचारी घरबसल्या काम करू शकतील. अवर सचिव आणि त्यावरील पदाच्या क्रमचाऱ्यांना कार्यालयात नियमित यावे लागणार आहे. केंद्रातील सर्व विभाग नवीन मार्गदर्शक सूचनांनुसारत त्यांचे रोस्टर पुन्हा तयार करतील. शक्य तितक्या सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील. अत्यंत आवश्यक असल्यास कार्यालयात बैठका होतील. मात्र, जितके होईल तितके हे टाळावे. सर्व कार्यालयांत नियमितपणे साफ-सफाई, स्वच्छतेवर विशेषत: जेथे नागरिकांची वरदळ जास्त आहे अशा ठिकाणी वारंवार साफसफाई आणि सॅनिटायजेशन करावे. केंद्र सरकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख आपल्या कार्यालयातील कॉरिडोर, कॅन्टीन इत्यादी परिसरात गर्दी होणार नाही याची काळजी घेतील. सर्व कर्मचारी कोविड प्रतबिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करतील. यामध्ये वारंवार हात धुणे, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग सारख्या गोष्टींचा समावेश आहे. वाचा : राज्यात 12 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद, Omicron बाधितांची संख्या चिंताजनक भारतात कोरोनाची तिसरी लाट धडकलीच भारतात कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता भारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ओमायक्रॉन बाधितांपैकी 75 टक्के रुग्ण हे देशातील प्रमुख महानगरांमध्ये आढळून आले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता सारख्या शहरांचा समावेश आहे.