आग्रा, 22 डिसेंबर: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राज्यासह देशभरात आंदोलनं, मोर्चे आणि निदर्शनं सुरू आहेत. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून उग्र स्वरुपाची निदर्शनं होत असलेली पाहायला मिळाली. या आंदोलनादरम्यान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात सध्या तणावाचं वातावरण असून अनेक जिल्ह्यांमधील इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यांमध्ये संचार बंदी लागू केली असून अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे. शनिवारी जमावाला पांगवताना आंदोलकांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव अगदी थोडक्यात वाचला आहे. बुलेटफ्रूफ जॅकेटच्या आत गोळी घुसली होती मात्र पोलीस कर्मचाऱ्याच्या पाकिटात अडकल्यानं त्याचा जीव वाचला. मला देवानं आणखी एक जगण्याची संधी दिली अशी प्रतिक्रिया पोलीस हवालदार विजेंद्र कुमार यांनी दिली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शनिवारी फिरोजाबादमध्ये जोरदार निदर्शनं झाली. यावेळी पोलीस कॉन्सटेबल विरेंद्र कुमार यांच्यावर आंदोलकांकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी गोळी त्यांचं बुलेटप्रूफ जॅकेटपासून आरपार गेली आणि पाकिटात अडकली त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. मात्र बुलेटप्रूफ जॅकेटच्या आरपार गेली कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शुक्रवारी काही ठिकाणी हिंसक निदर्शनं झाली. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. बिजनोर, संभल, फिरोजाबाद, मेरठ आणि कानपूरमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता आता ती संख्या वाढून 16 वर पोहोचली आहे. उत्तर प्रदेशात 15 जिल्ह्यांमध्ये हिंसक घटना घडल्या. सुधारि नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलनं करण्यात आली. संतप्त जमावाने रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली असून सध्या तणावाचं वातावरण आहे. जमावाकडून पोलिसांच्या गाड्यांसह सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं.