JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO: लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्यांचा हात; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

VIDEO: लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्यांचा हात; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्याची मागणी करतानाच सुधीर गुप्ता म्हणाले, की लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा (Aamir Khan is Responsible for Disturbing Population Ratio) हात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 जुलै : जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) योगी सरकारनं लोकसंख्या नियंत्रण धोरणाची घोषणा केली आहे. यानंतर देशभरात वाढती लोकसंख्या पाहता कठोर कारवाई करण्याची मागणी तीव्र झाली आहे. देशभरात उत्तर प्रदेशच्या नव्या लोकसंख्या धोरणाची चर्चा आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील मंदसौरचे भाजप खासदार सुधीर गुप्ता (BJP MP Sudhir Gupta) यांनी चित्रपट अभिनेता आमिर खानबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्याची मागणी करतानाच सुधीर गुप्ता म्हणाले, की लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा (Aamir Khan is Responsible for Disturbing Population Ratio) हात आहे. हे देशाचं दुर्भाग्य आहे. सेल्फी बेतली जीवावर; 6 जणांचा मृत्यू 35 गंभीर जखमी, पाहा LIVE VIDEO सुधीर गुप्ता म्हणाले, की आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता 2 मुलांसोबत आणि दुसरी पत्नी किरण राव आपल्या मुलासोबत कुठे जाईल, याची चिंता नाबी. मात्र, दादा आमिर आता तिसरीच्या शोधात निघाले आहेत. हा संदेश आहे एका हिरोचा? ते पुढे म्हणाले, की जग जे म्हणत होतं, की अंडे विकण्याशिवाय जास्त अक्कल नाही. इतकंच केलं तरी ठीक आहे.

संबंधित बातम्या

Raigad: काशीद बीच समोरील पूल कोसळल्याने एक कार आणि बाईक गेली वाहून, पाहा PHOTOS भाजप खासदार पुढे म्हणाले, की हे अत्यंत स्पष्ट आहे, की आपल्याला एक ना एक दिवस याचा विचार करावाच लागणार आहे. मी पाहिलं, की भारताची एक इंचही जमीन वाढली नाही आणि लोकसंख्या 140 कोटीपर्यंत पोहोचली. ही गोष्ट शुभेच्छा देण्याची किंवा अभिनंदन करण्यासारखी नाही. मागे वळून पाहिलं तर दिसतं, की भारताची फाळणी झाली होती, तेव्हा पाकिस्तानकडे जमीन जास्त गेली होती आणि लोकसंख्या कमी, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या