JOIN US
मराठी बातम्या / देश / मिशन 2024 साठी भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लान! '60-70' फॉर्म्युला तयार, ही आहे रणनीती

मिशन 2024 साठी भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लान! '60-70' फॉर्म्युला तयार, ही आहे रणनीती

BJP Plan For Loksabha Election 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 60-70 लोकसभा मतदारसंघांना लक्ष्य केलं आहे.

जाहिरात

भाजप मिशन 2024

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 जानेवारी : लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी भारतीय जनता पक्षाने अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी एक मेगा मास्टर प्लॅन बनवला आहे. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि बौद्ध यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोहोचण्याचा कार्यक्रम राबवणार आहे. एवढेच नाही तर भाजप अल्पसंख्याकबहुल लोकसभा मतदारसंघात स्कूटर यात्रा काढणार आहे. दिल्लीत होणाऱ्या अल्पसंख्याकांच्या परिषदेसाठी भाजपचीही मोठी योजना असून या परिषदेला पंतप्रधान मोदी संबोधित करू शकतात, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आपल्या स्कूटर यात्रेत मुस्लिम धार्मिक नेत्यांचाही समावेश करू शकतो, ज्यांच्या रणनीतीवर पक्षात चर्चा होत आहे. भाजपच्या योजनेनुसार, भाजप प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 5000 मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदायांना पक्षाशी जोडेल. एवढेच नाही तर मुस्लिम धर्मगुरूंना जोडून भाजप केंद्र सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांचा प्रचार तळागाळापर्यंत नेणार आहे. सर्व लोकसभा मतदारसंघात पोहोचण्याचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर भाजप अल्पसंख्याक स्नेहसंमेलन आयोजित करणार आहे. वाचा - शिवसेनेतल्या भूकंपानंतर उद्धव पहिल्यांदाच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, ठाण्यात ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन! सूत्राने सांगितले की भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीसाठी 60-70 लोकसभा मतदारसंघ आधीच लक्ष्य केले आहेत. या सर्व अल्पसंख्याक बहुल लोकसभेच्या जागा आहेत, जेथे अल्पसंख्याक समुदाय बहुसंख्य भूमिकेत आहेत. या योजनेनुसार भाजप 60-70 लोकसभा मतदारसंघात सुफी, सुशिक्षित मुस्लिम, डॉक्टर, इंजिनिअर, विणकर, कारागीर, छोटे व्यापारी आणि उलेमा यांच्यात पकड निर्माण करेल आणि त्यांना पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्याची योजना आहे.

भाजपच्या नियोजनानुसार लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप अल्पसंख्याक लोकसभा मतदारसंघात बूथ आणि पन्ना समिती व्हेरिफिकेशनचे काम लवकरच सुरू करणार आहे. एवढेच नाही तर भाजप या वर्षी एप्रिल/मे महिन्यात दिल्लीत मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांचे मोठे अधिवेशन घेणार आहे. त्यासाठी पक्षातर्फे दिल्लीत 3 लाख अल्पसंख्याकांची परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीत होणाऱ्या अल्पसंख्याक परिषदेला संबोधित करण्याची योजना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या