या 3 राज्यात निवडणुकांचे वाजले बिगुल

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये विधानसभा निवडणुकाचे अखेर बिगुल वाजले आहे. 

त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी 2023 मतदान होईल. 

तर 2 मार्चला या तिन्ही राज्यांची मतमोजणी होणार आहे. 

या राज्याच्या विधानसभेची मुदत मार्च संपत आहे. 

तीनही राज्यात पुरूषांच्या तुलनेत महिला अधिक प्रमाणात मतदान करतात. 

नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये 62.8 लाख मतदार आहेत.

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड व्यतिरिक्त मिझोराम, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्येही या वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत.

राजकीयदृष्ट्या हे वर्ष म्हणजे 2023 खूप महत्त्वाचे आहे, कारण या वर्षी 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

महाराष्ट्रात पुण्यात दोन मतदारसंघासाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.