JOIN US
मराठी बातम्या / देश / Bikaner Express Accident : तब्बल 12 डबे रेल्वे रूळावरून घसरले, चार डबे प्रवाशांसह जमिनीवर कोसळले, भीषण अपघात

Bikaner Express Accident : तब्बल 12 डबे रेल्वे रूळावरून घसरले, चार डबे प्रवाशांसह जमिनीवर कोसळले, भीषण अपघात

रेल्वे अपघाताची दुर्घटना ही आज संध्याकाळी जवळपास सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भयानक होता की प्रवाशांनी भरलेले चार डब्बे थेट जमीनीवर कोसळले.

जाहिरात

बिकानरे एक्सप्रेस रेल्वे रुळावरुन घसरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. संबंधित दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 13 डिसेंबर : पश्चिम बंगालच्या (West Bengal) जलपाईगुडी जिल्ह्यात भयानक आणि भीषण रेल्वे अपघात घडला आहे. बिहारच्या पाटणा येथून आसामच्या गुवाहाटी येथे निघालेल्या बिकानेर एक्स्प्रेसचा (Guwahati-Bikaner Express ) भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची तीव्रता प्रचंड मोठी आहे. घटनास्थळी एनडीआरएफची (NDRF) टीम, रेल्वे कर्मचारी-अधिकारी, प्रशासन, पोलीस बचावासाठी दाखल झाले आहेत. 30 ते 40 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटना प्रचंड भीषण आहे. बचाव पथकाच्या हाती आतापर्यंत तीन मृतदेह लागले आहेत. तसेच अनेकजण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेलं जात आहे. घटनास्थळी बाधित कुटुंबीयांचा प्रचंड आक्रोश सुरू आहे. घटनास्थळी आजूबाजूच्या परिसरातील शेकडो लोकांची गर्दी जमली आहे. काही स्थानिकांकडून बचाव पथकाला मदत कार्यात सहकार्य केलं जात आहे. संबंधित अपघाताची दुर्घटना आज संध्याकाळी जवळपास सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भयानक होता की, प्रवाशांनी भरलेले चार डबे थेट जमिनीवर आणि एक डबा पाण्यात कोसळला. त्यातून एका प्रवाशाला बाहेर काढण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. ( मोठी दुर्घटना ! पश्चिम बंगालमध्ये बिकानेर एक्सप्रेसचा अपघात, पाहा फोटो ) बिकानेर एक्स्प्रेसला परिसरातील आजूबाजच्या कोणत्याही रेल्वेस्थानकावर थांबा नव्हता. ट्रेन तिथून जात असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 30 ते 40 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच सिलिगुडी येथून एक रिलिफ ट्रेन पाठविण्यात आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर बंगालमधील मेडिकल कॉलेजला अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. ( पश्चिम बंगालमध्ये गुवाहटी-बिकानेर एक्स्प्रेस घसरली, घटनास्थळाचा पहिला VIDEO ) जलपाईगुडीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अपघातात जवळपास 20 प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या ट्रेनमधून राजस्थानच्या बिकानेर येथून 308 प्रवासी रवाना झाले होते. संबंधित दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासानाकडून 0151-2208222 हा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. तसेच जयपूरच्या नागरिकांसाठी 0141-2725942 हा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या