मधुबनी, (JNN)27 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान (Bihar Election 2020) एका जाहीर सभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्यावर कांदा हल्ला (Onion Attack) करण्यात आला होता. या प्रकारानंतर सभेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अखेर एका तरुणाला अटक केली आहे. हरलाखी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणगौर येथून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हेही वाचा… महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, बंडखोर नेत्याची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी मुखमंत्री नितीश कुमार यांनी 3 नोव्हेंबर रोजी एका जाहीर सभेला संबोधित केलं होतं. नितीश कुमार व्यासपीठावर भाषण देण्यासाठी उभे राहिले असता एका व्यक्तीनं त्यांच्या दिशेने कांदे भिरकावले होते. मात्र, व्यासपीठावर उपस्थित सुरक्षारक्षकांनी कांद्यांचा अचून झेल घेतला होता. त्यामुळे या कांदा हल्ल्यात मुख्यमंत्री थोडक्यात बचावले होते.
मुख्यमंत्री नितीश कुमार हरलाखी विधानसभा क्षेत्रातील गणगौर येथील नंद लाल महावीर प्लस टू हायस्कूलच्या मैदानावर जदयूचे उमेदवार सुधांशु शेखर यांचा प्रचार करण्यासाठी आले गेले होते. जाहीर सभेला ते संबोधित करत असताना व्यासपीठावर आरोपीनं कांदे फेक केली होती. मात्र, सुरक्षारक्षक समोर आल्यानं मुख्यमंत्री नितीश कुमार थोडक्यात बचावले. ‘खूब फेंको, खूब फेंको’, असं म्हणत नितीशकुमार यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं होत. तसेच सुरक्षारक्षक आणि आम जनतेला त्याकडे दुर्लक्ष करण्याची आवाहन देखील केलं होतं. हेही वाचा.. ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; सेक्स वर्कर्स महिलांना आर्थिक मदतीचा हात तेजस्वी यादव यांनी ट्वीट करून… बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर झालेल्या कांदे फेकची राजद नेते तेजस्वी यादव यांनी निंदा केली केली होती. याबाबत तेजवी यादव यांनी ट्वीट केलं होतं.
‘जाहीर सभेत अज्ञात व्यक्तीनं आदरणीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कांदे फेक केली. हा प्रकार अशोभनीय आहे. अलोकतांत्रिक आहे. लोकशाहीत प्रतिरोध हा केवळ मतदानातून दिसायला हवा. अदा अभद्र व्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं.