नवी दिल्ली,ता.26 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला येणाऱ्या काळात सर्वात जास्त धोका असल्याचा अहवाल गृहमंत्रालयाने दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूका आणि त्याआधी होणार प्रचार लक्षात घेऊन हल्ला हो शकते अशी माहिती गृहविभागाला मिळाली आहे. त्यामुळं पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे.
पंप्रधानांना असलेला धोका लक्षात घेऊन एसपीजीनेही आपलं सुरक्षा कडं आणखी कडक केलं आहे. त्यामुळे आता अधिकारी आणि मंत्र्यांनाही एसपीजीच्या परवानगिशीवाय पंतप्रधानांच्या जवळ जाता येणार नाही. एसपीजी म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप हा खास पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आला आहे.
निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधानांनी रोड शो करणं टाळावं असा सल्लाही पंतप्रधानांना देण्यात आल्याचं गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या या धोक्याची कल्पाना देण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहून पंतप्रधानांच्या दौऱ्याच्यावेळी सुरक्षेची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.