JOIN US
मराठी बातम्या / देश / भीषण रस्ता अपघात; बस- कंटेनरच्या धडकेत महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू

भीषण रस्ता अपघात; बस- कंटेनरच्या धडकेत महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू

या भीषण (Horrific Road Accident) अपघातात एका महिलेसहित 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 01 ऑक्टोबर: मोठा अपघात झाला आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भिंडमध्ये (Bhind) एक प्रवासी बस आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक बसली आहे. या भीषण (Horrific Road Accident) अपघातात एका महिलेसहित 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 15 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भिंडमध्ये राष्ट्रीय महामार्ग 92 वर गोहाड चौकाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ग्वाल्हेरला पाठवण्यात आलं आहे. सध्या पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. आज बस ग्वाल्हेरहून उत्तर प्रदेशातील बरेलीला भिंड मार्गे प्रवाशांसह जात होती. ही बस गोहाड चौकाजवळ वळली आणि पुरा येथे पोहोचताच भिंडकडून गोहाडच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कंटेनर बसला धडकून दरीत कोसळला. अपघात झालेली बस ग्वाल्हेरहून बरेलीला जात होती,अशी माहिती मिळतेय. हेही वाचा-  भयंकर! किचनमध्ये बिबट्याला पाहून कुटुंबाला फुटला घाम, 6 तास चालला संघर्ष पण शेवटी…    घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सर्व जखमींना गोहाड रुग्णालयात पाठवले आहे. तसंच सात जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना ग्वाल्हेरला उपचारासाठी पाठवलं आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी 7 पैकी 4 मृतांची ओळख पटवली आहे, ज्यात मृतांची ओळख रजत राठोड जिल्हा ग्वाल्हेर, हरेंद्र तोमर जिल्हा इटावा, हरिओम पटेरिया जिल्हा हरदोई, राणी आदिवासी जिल्हा सागर अशी आहे. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली असून तीन मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. हेही वाचा-  धक्कादायक! गोणीत सापडले तब्बल 20 माकडांचे मृतदेह घटनेनंतर जिल्हाधिकारी सतीश कुमार आणि पोलीस अधीक्षक मनोज सिंह यांनीही घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा आढावा घेतला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या