JOIN US
मराठी बातम्या / देश / Assembly Election 2022: 5 राज्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; 10 फेब्रुवारीपासून मतदान, 10 मार्चला निकाल

Assembly Election 2022: 5 राज्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; 10 फेब्रुवारीपासून मतदान, 10 मार्चला निकाल

गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 जानेवारी : देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे सर्वत्र निर्बंध कडक करण्यात आले आहे. अशातच पाच राज्यात निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission announced 5 state assembly election ) पत्रकार परिषद घेत गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण 7 टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. कोरोनाच्या काळात निवडणूक घेणे हे आव्हानात्मक आहे. पण निवडणूक घेणे हे आमचे कर्तव्य आहे. ‘यकीन हो तो कोई भी रास्ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है’ अशी शायरी करत सुशील चंद्रा यांनी कोरोनाच्या संकटात निवडणुका घेण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली.

 तसंच, कोरोनाचे संकट पाहता १५ जानेवारीपर्यंत रॅली, पदयात्रा, रोड शो, सायकल, बाइक रॅली काढण्यास मनाई करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या मदतीने सभा घ्याव्यात, असं आवाहनही चंद्रा यांनी केलं.

यावेळी पाच राज्यांमध्ये एकूण 18 कोटी नवे मतदार हे मतदान करणार आहे. आचार संहितेचं उल्लंघन केल्यास तक्रार करण्यासाठी See Vigil हे अॅप तयार करण्यात आले आहे. यावर फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर 100 मिनिटांच्या आत कारवाई करण्यात येईल, असंही चंद्रा यांनी सांगितलं. ( इथे कमी वयाच्या मुलींना जबरदस्ती बनवलं जातं आई; यासाठी चालवल्या जातात फॅक्ट्री ) गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा (UP assembly election) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.  ७ टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. तर पंजाब (Punjab assembly election) विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात पार पडणार आहे. तर मणिपुर (Manipur assembly election) मध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे.  गोवा आणि उत्तराखंड (Goa and Uttarakhand assembly election 2022) मध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.  मार्च-एप्रिल महिन्यात गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेचा समाप्त होणार आहे. कोरोनाची लाट पाहत योग्य ती खबरदारी घेऊन ही निवडणूक जाहीर झाली आहे. असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम! पहिल्या टप्पा - 10 फेब्रुवारीला मतदान दुसरा टप्पा -14 फेब्रुवारी तिसरा टप्पा -20 फेब्रुवारी चौथा  टप्पा -23 फेब्रुवारी पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी सहावा टप्पा - 3 मार्च सातवा टप्पा  -7 मार्च पाचही राज्यांची 10 मार्चला मतमोजणी चार राज्यात भाजपचे सरकार पाच राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहे, त्या पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपची सत्ता आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ हा 14 मे रोजी समाप्त होत आहे.  उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण 403 जागा आहे. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी समाप्त होणार आहे. उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी  समाप्त होणार आहे. उत्तराखंड विधानसभेसाठी 70 जागा आहे. उत्ताराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपणार आहे. गोवा विधानसभेसाठी एकूण 40 जागा आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. तर मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च रोजी समाप्त होणार आहे. मणिपूरमध्ये एकूण 60 जागा आहे. एन बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या