आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
दिसपूर, 2 जानेवारी : आसामचे (Assam Government) मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा (Assam Chief Minister Himanta Biswa Sarma) यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुट्टी जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांना आपले आई-वडील आणि कुटुंबियांना वेळ देता यावा यासाठी दोन दिवसांच्या विशेष सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. या सुट्ट्या येत्या 6 आणि 7 जानेवारीला देण्यात येत आहेत. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी राज्य सरकारने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाची आता अंमलबजावणी होणार आहे. याबाबत हिमंत बिस्व सरमा यांनी ट्विटरवरदेखील माहिती दिली आहे. “मी आसाम सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना निवेदन देतो की विशेष सुट्टीच्या रुपात 6 आणि 7 जानेवारीला आपले आई-वडील, नातेवाईकांसोबत वेळ घालवा”, असं त्यांनी म्हटलं आहे.
कर्मचाऱ्यांच्या पदरात दोन नाही तर चार सुट्ट्या खरंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना 6-7 जानेवारीला सुट्ट्या दिल्या असल्या तरी कर्मचाऱ्यांच्या पदरात आता सलग चार सुट्ट्या पडल्या आहेत. कारण 6 तारखेला गुरुवार आहे आणि 7 डिसेंबरला शुक्रवार आहे. त्यानंतर शनिवार-रविवारची नियमित सुट्टी आहे. अशाप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरात थेट सलग चार सुट्ट्या पडणार आहेत. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. हेही वाचा : JOB ALERT: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई इथे भरती; करा अर्ज ‘या’ कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार नाही विशेषत: आई-वडिलांच्या भेटीसाठीच त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते चौथ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. पण ज्या कर्मचाऱ्यांचे आई-वडील जीवंत नाहीत त्यांना या सरकारी सुट्टीचा लाभ घेता येणार नाही. राज्यात तैनात असलेले आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांपासून ते सरकारी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण या सुट्टीचा आनंद लुटू शकतात. पण पोलीस अधिक्षक स्तरावारील पोलीस अधिकारी तसेच फिल्डवर असणारे पोलीस कर्मचारी 6-7 जानेवारीला सुट्टी घेऊ शकणार नाहीत. पण नंतर त्यांना ती सुट्टी मिळू शकेल.