नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: कोविड-19 (COVID-19) विरुद्ध स्वदेशी लस कोव्हॅक्सीन 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. लॅन्सेट (Lancet) या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या युद्धात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्डनंतर फक्त कोव्हॅक्सीनचा वापर केला जात आहे. ही लस हैदराबादस्थित भारत बायोटेकने (Bharat Biotech) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. लॅन्सेटद्वारे एक विधान जारी करण्यात आले होतं की, निष्क्रिय व्हायरस तंत्रज्ञानाचा वापर करून कोव्हॅक्सीन दोन डोस दिल्यानंतर दोन आठवड्यांनंतर एक मजबूत एंटीबॉडी प्रक्रिया सुरू करते. जर्नलमध्ये असे म्हटलं आहे की, चाचणी दरम्यान लस-संबंधित मृत्यूची कोणतीही गंभीर प्रकरणे नोंदवली गेली नाहीत. भारतात नोव्हेंबर 2020 ते मे 2021 पर्यंत चाललेल्या या चाचणीमध्ये 18-97 वयोगटातील 24 हजार 419 लोकांनी भाग घेतला होता. हेही वाचा- मित्राच्या वाढदिवसाला गेले अन्…; दुर्दैवी घटनेत जीवलगानं डोळ्यादेखत तडफडत सोडला प्राण भारत बायोटेक आणि ICMR द्वारे अंतर्गत अभ्यासासाठी आर्थिक मदत करण्यात आली होती. यासोबतच दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांचाही काही प्रमाणात सहभाग होता. भारतात लवकर मंजुरी मिळण्यावरून निर्माण झालेल्या वादावर मात करण्यासाठी ही आकडेवारी उपयुक्त ठरू शकते, असे बोलले जात आहे. जानेवारीत भारतात कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आली. त्या काळात लसीच्या चाचण्यांची अंतिम फेरी पूर्ण व्हायची होती. तेव्हापासून कोव्हॅक्सीनचे कोट्यवधी डोस लोकांना देण्यात आले आहेत. त्याच वेळी, जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात या लसीचा आपत्कालीन वापरासाठी यादीत समावेश केला आहे. लॅन्सेटच्या म्हणण्यानुसार, लसीचा दीर्घकालीन परिणाम, परिणामकारकता आणि रोगाविरूद्ध संरक्षण तपासण्यासाठी पुढील तपासणी आवश्यक आहे. WHOच्या मान्यतेनं आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ होईल WHO ने या महिन्याच्या सुरुवातीला लसीला मान्यता दिल्यानं लसीचा डोस घेतलेल्या भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ होईल आणि भारत बायोटेकद्वारे निर्मित अँटी-कोविड-19 लस ओळखू इच्छिणाऱ्या देशांशीही भारत चर्चा करत आहे. दरम्यान स्वतंत्र आदेशासाठी जारी केले जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. हेही वाचा- क्रिकेटचा शौकिन आमिर रियाज झाला दहशतवादी, लष्करानं केला Game Over परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं की, 96 देशांनी WHOनं मान्यता दिलेल्या लसींना मान्यता दिली आहे. तर काही देशांनी फक्त कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. WHO ने Covishield आणि COVAXIN या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे.