JOIN US
मराठी बातम्या / देश / चोरानं मंदिरातले दागिने चोरण्यासाठी खिडकी फोडली, पण नंतर मिळाली अशी काही शिक्षा की..

चोरानं मंदिरातले दागिने चोरण्यासाठी खिडकी फोडली, पण नंतर मिळाली अशी काही शिक्षा की..

हा चोर मंदिरात चोरी करायला गेला आणि देवानं अशी काही शिक्षा दिली की, त्या चोराच्या जन्मभर लक्षात राहील, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. तो रंगेहाथ तर सापडलाच; शिवाय, त्याला मंदिरातून बाहेर पडण्यासाठी इतर लोकांना बोलवावं लागलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 6 एप्रिल : वाईट कर्माचं फळ वाईट असतं असं म्हणतात. आपणही हे वाक्य अनेकदा ऐकलेलं असतं. असाच काहीसा प्रकार एका चोराच्या बाबतीत घडलाय. हा चोर मंदिरात चोरी करायला गेला आणि देवानं अशी काही शिक्षा दिली की, त्या चोराच्या जन्मभर लक्षात राहील, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. या चोरानं मंदिरातले दागिने चोरण्यासाठी खिडकी फोडली आणि नंतर त्यात स्वतःच अडकला. यामुळे तो रंगेहाथ तर सापडलाच; शिवाय, त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी इतर लोकांना बोलवावं लागलं. आंध्र प्रदेशात ही घटना घडली असून या चोराला पकडण्यात आलं आहे. पापा राव असं या चोराचं नाव आहे. हा चोर आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरील जिल्हा श्रीकाकुलममधील जामी येल्लम्मा मंदिराची खिडकी फोडून आत घुसला. त्यानं देवतेला अर्पण केलेले दागिने सोबत घेतले. मात्र, यानंतर बाहेर पडण्यासाठी त्यानं प्रयत्न करताच तो अर्ध्याच छिद्रात अडकला.

अनेक तास उलटूनही तिथून निघू शकला नाही, तेव्हा त्यानं रडून-ओरडून गयावया करत लोकांना मदतीसाठी हाका मारल्या. यानंतर ग्रामस्थ तिथं जमा झाले. लोकांनी त्याला भिंतीला पाडलेल्या छिद्रातून बाहेर काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. हे वाचा -  16 हजार प्रवासी,1 कोटींची दंड वसूल; कोण आहे ‘हा’ रेल्वेची तिजोरी भरणारा TTE वाईट कृत्याचे तत्काळ वाईट परिणाम, वाचा अशा आणखी दोन घटना 1. दानपेटीत अडकला चोराचा हात अशीच एक घटना छत्तीसगडमधील कोरबा इथं गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घडली होती. त्या वेळेस दोन चोरटे श्री सिद्ध वटेश्वर हनुमान शनी मंदिरात चोरी करण्यासाठी गेले होते. त्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला व दानपेटीतील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला असता पेटीच्या आत एका चोरट्याचा हात अडकला. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराच्या पुजाऱ्यानं त्याला पाहिलं आणि पोलिसांना कळवलं. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. हे वाचा -  पिगी बँकेत नाणी जमा करून मजुरानं खरेदी केली Scooty, पोत्यात पैसे घेऊन पोहोचला शोरूमला

 2. चोरीची रक्कम पाहून चोराला आला हृदयविकाराचा झटका

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये चोरी केल्यानंतर हाती आलेलं घबाड पासून एका चोराला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानं त्याच्या मित्रासोबत एका सर्व्हिस सेंटरमध्ये चोरी केली होती. तिथून दोघांनी 7 लाख रुपये चोरले. आपल्या हाताला काही हजार रुपये लागतील, असं दोघांनाही वाटलं, पण लाखो रुपये डोळ्यांसमोर पाहताच त्यातल्या एका चोराला हृदयविकाराचा झटका आला. चोरीचा एवढा मोठा पैसा त्याच्या उपचारासाठी गेला. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या