JOIN US
मराठी बातम्या / देश / 360 प्रवाशांच्या विमानातून एकट्याचा मुंबई-दुबई प्रवास; एका तिकिटाचा खर्च 18 हजार, इंधनाचा खर्च वाचून चाट पडाल!

360 प्रवाशांच्या विमानातून एकट्याचा मुंबई-दुबई प्रवास; एका तिकिटाचा खर्च 18 हजार, इंधनाचा खर्च वाचून चाट पडाल!

ही व्यक्ती चार्टर्ड फ्लाइटचा अनुभव घेत होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मे : मुंबईत राहणाऱ्या भावेश जावेरींचा 19 मे रोजी दुबईपर्यंत प्लेनचा प्रवास आठवणीत राहिला आहे. ते बोइंग 777 प्लेनमधून 18 हजार रुपयांचं तिकीट बुक करुन दुबईला गेले होते. यादरम्यान ते 360 सीट्सच्या संपूर्ण विमानात एकटे होते. त्यांच्यासाठी हा अनुभव कोणत्याही चार्टड फ्लाइटरेक्षा कमी नव्हता. त्यांची एन्ट्री होताच एअर हॉस्टेजेस आणि कॅप्टननी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. 40 वर्षांचे भावेश जावेरी स्टारजेम्स ग्रुपचे CEO आहेत. त्यांच्या कंपनीचं दुबईतदेखील एक ऑफिस आहे. अनेकदा ते मुंबई-दुबई असा प्रवास करीत असतात. मात्र हा प्रवास त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरला आहे. भावेन यांनी सांगितलं की, कामानिमित्ताने ते एअरलाइन्स एमिरेट्सला कॉल करुन एक आठवड्यांपूर्वी तिकीट बुक केलं होतं. याची किंमत 18 हजार रुपये होते. जावेरी सांगितलं की, सर्वसाधारणपणे ते बिजनेस क्लासने प्रवास करतात. मात्र यंदा त्यांनी इकॉनॉमी क्लासचं तिकीट केलं होतं. त्यांच्या फ्लाइटची वेळ 4.30 वाजताची होती. जेव्हा ते फ्लाइटमध्ये बसले तेव्हा ते हैराण झाले. कारण त्यांच्याशिवाय फ्लाइटमध्ये एकही प्रवासी नव्हता. हे ही वाचा- सलाम! एक किडनी बहिणीला दान, प्रकृती नाजूक; तरीही कोरोना रुग्णांसाठी कसली कंबर मुंबई ते दुबई फ्लाइटच्या इंधनाचा खर्च 8 लाख रुपये या अडीच तासाच्या फ्लाइटसाठी बोइंग 777 विमानात 8 लाख रुपयांचं इंधन लागतं. अशात केवळ एका यात्रीसाठी मुंबई ते दुबई जाण्याचा एमिरेट्सचा निर्णय वेगळा होता. एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितलं की, दुबईवरुन विमान मोठ्या संख्येने प्रवाशांना घेऊन मुंबईला आला असेल आणि त्याला दुबईला परतायचं असेल. अशात एयरलाइन्सने त्याच फ्लाइटमध्ये भावेशला तिकीट दिलं असेल. तसं पाहता मुंबई ते दुबई मार्गावर एका चार्टर्ड फ्लाइचं भाडं 70 लाख रुपये असतं.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या