JOIN US
मराठी बातम्या / देश / घोटभर पाण्यासाठी मालकानं घेतला जीव; बेदम मारहाणीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, हृदय पिळवटणारी घटना

घोटभर पाण्यासाठी मालकानं घेतला जीव; बेदम मारहाणीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, हृदय पिळवटणारी घटना

हातपंपावरून विना परवाना पाणी प्यायल्याने (drink water from hand pump without permission) हातपंपाच्या मालकांनी 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण (old man beating) केली आहे. या मारहाणी वृद्धाचा दुर्दैवी अंत (Death) झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सालेमपूर, 07 नोव्हेंबर: गुरांसाठी गवत कापायला गेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीला तहान लागल्याने ते पाणी पिण्यासाठी एका हातपंपावर गेले. याठिकाणी त्यांनी कोणालाही न विचारता हातपंपावरून पाणी पित आपली तहान भागवली. पण विना परवाना पाणी प्यायल्याने (drink water from hand pump without permission) संबंधित हातपंपाच्या मालकांनी 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण ((old man beating)) केली आहे. या मारहाणी वृद्धांचा दुर्दैवी शेवट (70 years old man dead) झाला आहे. घोटभर पाण्यासाठी वृद्धाचा जीव गेल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती देताना मृत वृद्धाचा मुलगा रमेश सैनी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, माझे वडील गुरांना गवत आणण्यासाठी शेतात गेले होते. भर उन्हात गवत कापल्याने त्यांना तहान लागली होती. त्यामुळे घशाची कोरड भागवण्यासाठी ते जवळच्याच एका हातपंपावर पाणी पिण्यासाठी गेले. याठिकाणी ते कोणालाही न विचारता हातपंपावरून पाणी प्यायले. परवानगीशिवाय पाणी प्यायल्याचा आणि हातपंप वापरल्याचा मालकांना राग आला. हेही वाचा- पाण्यासाठी रेल्वेतून उतरली अन्…; डजनभर नराधमांनी तोडले लचके, नग्नावस्थेतच रस्त्याच्याकडेला फेकलं यामुळे संबंधित हातपंपाचा मालक आणि त्याच्या मुलाने तहानलेल्या वृद्धाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत 70 वर्षीय वृद्ध सैनी गंभीर जखमी झाले. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी पहाटे संबंधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत वृद्धाचे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचं हातपंपाच्या मालकाशी कोणतंही वैर नव्हतं. असं असूनही विना परवना जातीतीलच काही लोकांनी वृद्धाला मारहाण केली आहे. संबंधित घटना बिहार राज्यातील वैशाली तालुक्यातील सालेमपूर गावातील आहे. ही दुर्दैवी घटना समोर येताच गावात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या