JOIN US
मराठी बातम्या / देश / केंद्राची मोठी कारवाई; 'या' कारणामुळे लाखो सबस्क्राइबर्स असलेल्या 8 YouTube न्यूज चॅनेलवर बंदी

केंद्राची मोठी कारवाई; 'या' कारणामुळे लाखो सबस्क्राइबर्स असलेल्या 8 YouTube न्यूज चॅनेलवर बंदी

ब्लॉक करण्यात आलेले हे यूट्यूब चॅनेल 114 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. या चॅनेलचे 85 लाख 73 हजार सदस्य आहेत. या सर्व चॅनल्सवर IT नियम 2021 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (YouTube news channels blocked)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 18 ऑगस्ट : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक भारतीय आणि पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेलवर कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित दुष्प्रचार प्रसार करणारे 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. या चॅनेलमध्ये 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान आधारित यूट्यूब चॅनेलचा समावेश आहे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कोरोना वाढला, विमान प्रवासाबाबत DGCA चे कडक नियम, न पाळल्यास कारवाई ब्लॉक करण्यात आलेले हे यूट्यूब चॅनेल 114 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. या चॅनेलचे 85 लाख 73 हजार सदस्य आहेत. या सर्व चॅनल्सवर IT नियम 2021 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या चॅनलच्या माध्यमातून भारताविरोधी खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. हे यूट्यूब चॅनेल ब्लॉक  - हे डेमोक्रेसी टीव्ही, यू अँड व्ही टीव्ही, एएम राजवी, ग्लोरियस पवन मिथिलांचल, सीटॉप 5 टीएच, सरकार अपडेट्स आणि सब कुछ देखो. याशिवाय न्यूज की दुनिया नावाचं पाकिस्तानमधील यूट्यूब चॅनलही ब्लॉक करण्यात आलं आहे. Flipkartला दणका! निकृष्ट दर्जाची उत्पादनं विकल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड; ग्राहकांना पैसे परत देण्याचे आदेश? याआधीही उचलेलं पाऊल - 21 डिसेंबरपासून भारताविरोधात मजकूर प्रसारित करणारे तब्हल 102 यूट्यूब चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत. याआधीही 25 एप्रिल 2022 रोजी मोदी सरकारने 16 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते. त्या चॅनेल्समध्ये 10 भारतीय आणि 6 पाकिस्तान आधारित चॅनेल होते. हे चॅनेल आयटी नियम 2021 अंतर्गत ब्लॉक करण्यात आले होते. आता पुन्हा सरकारने मोठी कारवाई करत आणखी आठ चॅनेल ब्लॉक केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या