JOIN US
मराठी बातम्या / देश / बुराडी प्रकरणात समोर आली 'मृत्यूची डायरी', या आहेत धक्कादायक 10 गोष्टी

बुराडी प्रकरणात समोर आली 'मृत्यूची डायरी', या आहेत धक्कादायक 10 गोष्टी

पोलीस तपासात एक डायरी सापडली. त्यात 2017पासूनच्या नोंदी आहेत. हे कुटुंब खूप धार्मिक होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 जुलै : दिल्लीच्या बुराडी भागात काल एकाच घरात 11 मृतदेह सापडले आहेत. यात 7 महिला आणि 4 पुरुषांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले. सगळ्यात गंभीर म्हणजे या सर्व मृतांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. पोलीस तपासात एक डायरी सापडली. त्यात 2017पासूनच्या नोंदी आहेत. हे कुटुंब खूप धार्मिक होतं. न्यूज18शी बातचीत करताना भूपी भाटियांचे शेजारी म्हणाले, हे कुटुंब अनेक धार्मिक विधी करायचे. त्यांचे बरेच निर्णय पुजाऱ्यांना विचारून घेतले जायचे. हेही वाचा महाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण VIDEO : मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास, आता कारवाई करणार का ?

‘मला कोणाचा खून करायला सांगितलं तर मी…’ - राज ठाकरे

त्या डायरीमध्ये काय नोंदी होत्या?

  1. डोळ्यावर चांगल्या प्रकारे पट्टी बांधा
  2. तुमच्या समोर शून्यच दिसलं पाहिजे
  3. दोरखंडासोबत सुती ओढण्या किंवा साडी वापरायची
  4. सात दिवस सतत पूजा करायची. मोठ्या श्रद्धेनं साधना करायची. कोणी गेलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करायचं.
  5. बेबे उभी राहू शकत नाही तर दुसऱ्या खोलीत आडवी होऊ शकते
  6. सगळ्यांचे विचार सारखेच असावेत. असं केलंत तर पुढची कामं व्यवस्थित होऊ शकतात.
  7. मंद प्रकाश असावा
  8. हाताच्या पट्ट्या राहिल्या तर मग डोळ्यावर डबल बांधायच्या
  9. तोंडावरची पट्टीही डबल करा
  10. रात्री 12 ते 1मध्ये ही क्रिया करायची आहे. याआधी होम करायचा आहे.

दरम्यान, या कुटुंबाच्या नातेवाईकांनी हा खूनच आहे, असं म्हटलंय. हे लोक शिकलेले होते, अंधश्रद्धाळू नव्हते असं सांगितलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या