लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 23 ऑक्टोबर : नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, हे सरकार ईडी (ED), सीबीआय (CBI), इन्कम टॅक्स (Income Tax), एनसीबीची (NCB) कारवाईच फक्त महाराष्ट्रात आहे… महाराष्ट्र हे तुळसी वृंदावन आहे, इथे गांजा पिकत नाही. काहींना वाटतं की या तुळशीत आपण गांजा पिकवू पण ते शक्य नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर. मी मागे म्हणालो होतो की यातूनही सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा. इतकंच राहीलं आहे आता. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर एकत्र मिळून काम केलं तर हे सरकार पुढील 25 वर्षे काम करेल. देशात उत्तम चालणार सरकार उद्धव ठाकरेंचं आहे. कोणी कितीही फडफड केली तरी काही होणार नाही, त्यांचे पंख झडतील पण हे सराकर मजबूत आहे आणि राहील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. वाचा : …अन् नाशकात शिवसेनेच्या होर्डिंगवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटोच झाला गायब, पाहा VIDEO नवाब मलिक यांना मी चांगलं ओळखतो, त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते न्यायालय योग्य की अयोग्य ठरतील. त्या कारवाईत जे पंच वापरले ते भाजपचे होते, त्यापैकी काही फरार आहेत. क्रूझवर करण्यात आलेली कारवाई आहे…अशा प्रकारची कारवाई मी कधी बघितली नाही. नवाब मलिक यांनी जी माहिती समोर आणली त्याला तुम्हाला प्रतिवाद करावा लागेल. त्यांचे माहितीचे सोर्स योग्य असतील. दूध की दूध पाणी की पाणी लवकरच होईल असंही संजय राऊत म्हणाले. मी ठाकरे आणि पवारांचा प्रवक्ताच आहे ठाकरे देशाचे नेते आहेत. सोमय्या यांना माहीत नसेल तर मी सांगतो पवार हे मोदींचे गुरू आहेत. ते जाहीरपणे सांगतात की पवारांच्या बोटावर धरून मोठा झालोय. मी पुण्याचे जे पुरावे दिले प्रसाद लाड यांच्याशी संबधीत आहेत. परमबीर सिंग देशाच्या बाहेर केंद्राच्या परवानगीशिवाय कसे गेले हे समजत नसेल तर आरोप करणाऱ्यांनी हिमालयात जावं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सर्वज्ञानी समजणाऱ्यांना अजूनही उच्च प्रतिच्या गांजाची नशा, चित्रा वाघांचा सरकारवर आरोप औरंगाबाद जिल्ह्यातील बीडकिनजवळच्या तोंडोली शिवारातील वस्तीवर काही सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करत पुरुषांना जबर मारहाण केली होती. काही महिलांवरही दरोडेखोरांनी शारीरिक अत्याचार केले होते. या घटनेनंतर चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकारचे माजी गृहमंत्रीच गायब असताना त्यांच्याकडून कायदा आणि सुव्यस्थेची काय अपेक्षा कऱणार, असा सवाल त्यांनी केला. दरोडा आणि अत्याचाराच्या प्रसंगामुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यात मोगलाई आणि निजामशाही असल्याची सर्वसामान्यांची भावना झाल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व विषयांवर ज्ञान झाडणाऱ्या सर्वज्ञानी लोकांची उच्च प्रतिच्या गांजाची नशा उतरली नाही का, असा सवाल करत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. आम्ही बोलतो, तेव्हा विरोधकांचे थोबाड फोडण्याची भाषा करणारे नेते आता गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे.