नाशिक, 18 जुलै: गेल्या महिन्यात 5 जून रोजी उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील कळंब (Kalamb) याठिकाणी एक दरोड्याची (Robbery) घटना उघडकीस आली होती. आरोपींनी दरोडा टाकताना संबंधित सुरक्षा रक्षकाची निर्घृण हत्या (Security guard murder case) देखील केली होती. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण बराच तपास करूनही आरोपीचा काहीही सुगावा लागत नव्हता. दरम्यान कळंब तालुक्यातील काही भटके लोकं नाशकात येऊन गजरा विक्रीचं (Garland seller) काम करत असल्याची माहिती कळंब पोलिसांना मिळाली. यानंतर कळंब पोलिसांनी आरोपीच्या वर्णनासह ही माहिती नाशकातील मुंबई नाका पोलिसांना दिली हेही वाचा- आई-लेकीने सुपारी देऊन पोलीस हवालदार असलेल्या वडिलांचा गळा चिरला, गडचिरोली हादरलं या माहितीच्या आधारे नाशकातील मुंबई नाका पोलिसांनी नंदीनी नदीच्या काठावरून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईनाका पोलिसांनी द्वारका ते मुंबईनाका परिसरात महामार्गावर गजराविक्री करणाऱ्या कुटुंबीयांची चौकशी सुरु केली. तसेच साध्या वेशात संशयित कुटुंबावर पाळतही ठेवली. संशय पक्का होताच, पोलिसांनी सुनील नाना काळे नावाच्या 27 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तो कळंब तालुक्यातील तेर येथील रहिवासी आहे. हेही वाचा- 44 वर्षानंतर तरुणीवरील बलात्काराचं आणि हत्येचं गूढ उलगडलं; DNA मुळे मोठा खुलासा आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीनं कळंब याठिकाणी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर मुंबई नाका पोलिसांना संबंधित आरोपीला कळंब पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या घटनेचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत. आरोपी मागील एक महिन्यांपासून कळंब पोलिसांना गुंगारा देत, नाशकात येऊन गजरा विक्रीचं काम करत होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. आरोपीनं यापूर्वीही अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याचा संशय पोलिसांना आहे.