JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / भुजबळ आणि सुहास कांदेंच्या वादात अंडरवर्ल्डची एंट्री, सेनेच्या आमदाराला छोटा राजनकडून धमकी?

भुजबळ आणि सुहास कांदेंच्या वादात अंडरवर्ल्डची एंट्री, सेनेच्या आमदाराला छोटा राजनकडून धमकी?

छोटा राजनच्या (Chhota Rajan) पुतण्याने फोनकरून धमकी दिल्याचा दावा कांदेंनी केला आहे.

जाहिरात

छोटा राजनच्या (Chhota Rajan) पुतण्याने फोनकरून धमकी दिल्याचा दावा कांदेंनी केला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 28 सप्टेंबर :  नाशिकमध्ये महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद चव्हाट्यावर आला आहे.  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (NCP senior leader Chhagan Bhujbal) आणि शिवसेना आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kande) यांच्यातील वादाला आता अंडरवर्ल्डची किनार लागली आहे. सुहास कांदे यांनी पोलिसांकडे पत्र लिहून तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचा दावा कांदे यांनी केला आहे.  छोटा राजनच्या (Chhota Rajan) पुतण्याने फोनकरून धमकी दिल्याचा दावा कांदेंनी केला आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे समसमान वाटप न झाल्यामुळे सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केलेली आहे. ही रिट याचिका नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात दाखल केली आहे. IREL Recruitment: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई इथे 88,000 कमावण्याची संधी दरम्यान, 27 तारखेला संध्याकाळी सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन केला होता. उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे अन्यथा तुझ्या कुटुंबाचे चांगले होणार नाही, अशी धमकी फोनवर दिली, अशी माहिती सुहास कांदे यांनी दिली. Redmi-Realme ला टक्कर देण्यासाठी आता Flipkartचा मोबाइल लाँच,आहेत भन्नाट फीचर्स विशेष म्हणजे, 11 सप्टेंबर रोजी छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात एका बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती. छगन भुजबळ यांचा नांदगावचा अतिवृष्टी दौरा वादळी ठरला होता. छगन भुजबळ हे अतिवृष्टी भागाचा आढावा घेण्यासाठी नांदगावात पोहोचले होते. तहसील कार्यलयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. निधी देण्यावरूनच हा वाद झाला होता. त्यानंतर सुहास कांदे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या