JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / शिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यावर सर्जिकल स्ट्राईक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

शिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यावर सर्जिकल स्ट्राईक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये सुद्धा शिवसेनेनं भाजपला मोठा दणका दिला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगर परिषदेतील 10 नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवक अशा बारा जणांनी सर्जिकल स्ट्राईक करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. याशिवाय भाजप युवा मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील (hinganghat nagar parishad) उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान १० नगरसेवक आणि २ माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. हिंगणघाट येथे 38 नगरसेवक आहेत त्याच्या पैकी 28 नगरसेवक भाजपचे होते. हिंगणघाट नगरपालिकेवर सध्या भाजपचीच सत्ता आहे, असं असतानाही भाजपचे 10 विद्यमान नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला आहे. हे ही वाचा- कोथरुडमध्ये तिकीट नाकारलेल्या मेधा कुलकर्णींची दखल, राष्ट्रीय पातळीवर दिलं स्थान याशिवाय आणखी काही नगरसेवक सेनेत प्रवेश घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी सेनेत प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे. आणखी पंचायत समिती आणि अन्य अनेक जणं सेनेत प्रवेश करणार आहेत. भविष्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेना भक्कम कशी करावी यासाठी आमचा प्रयत्न असून नक्कीच हिंगणघाट नगर परिषदेमध्ये बदल घडवून आणू, असा विश्वास व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये सुद्धा शिवसेनेनं भाजपला मोठा दणका दिला होता. जळगाव महापालिका (Jalgaon municipal corporation)  महापौर निवडणुकीत भाजपचे 27 नगरसेवक (BJP Corporator) सेनेत खेचून आणले होते. त्यामुळे जळगाव महापालिकेत सेनेचा भगवा फडकला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या