JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मित्रानेच तोडले हात-पाय, शिरही केलं धडावेगळं, मुंबईतील थरारक घटनेचं उलगडलं गूढ

मित्रानेच तोडले हात-पाय, शिरही केलं धडावेगळं, मुंबईतील थरारक घटनेचं उलगडलं गूढ

Murder in Mumbai: काही दिवसांपूर्वी मुंबईतील एपीएमसी परिसरात मानवी शरीराचे हात आणि पाय हे अवयव एका पिशवीत आढळले होते. या घटनेचा उलगडा पोलिसांनी केला आहे.

जाहिरात

रात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वे समांतर रस्त्यावर काही जणांनी त्यांची रिक्षा अडवली. दोघांना बाहेर काढले आणि...

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी मुंबईतील एपीएमसी परिसरात मानवी शरीराचे हात आणि पाय हे अवयव एका पिशवीत आढळले होते. चेहरा आणि धड गायब असल्यानं संबंधित मृतदेहाची ओळख पटवणं खूपच अवघड होतं. पण मृतदेहाच्या हातावर असणाऱ्या टॅटूवरून पोलिसांनी मृताची ओळख पटवून हत्येचा उलगडा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक (Accused arrest) केली आहे. आरोपी तरुण हा मृताचा मित्र असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. रमेश मंडोदिया असं हत्या झालेल्या युवकाचं नावं आहे. 12 सप्टेंबर रोजी एपीएमसीमधील एका निर्जनस्थळी मानवी शरीराचे हात आणि पायाचे तुकडे एका पिशवीत आढळले होते. या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत खूनाचं रहस्य उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमितकुमार चव्हाण याला अटक केली आहे. आरोपीनं मृत रमेशला दारू पाजून त्याची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली आहे. हेही वाचा- संशयाने केला कुटुंबाचा सर्वनाश; पहाटे पत्नीचा दोरीनं आवळला गळा अन्… हत्या का केली?    मृत रमेश याने काही दिवसांपूर्वी आरोपी सुमितकुमारला 17 हजार रुपये उसने दिले होते. बरेच दिवस होऊनही पैसे परत मिळत नसल्यानं रमेशने सुमितकुमारकडे पैशांसाठी तगादा लावला होता. यामुळे सुमितकुमारनं रमेशच्या हत्येचा कट रचला. 9 सप्टेंबर रोजी आरोपी सुमितकुमार आणि रमेश दोघांनी रमेशच्या घरात बसून दारू पार्टी केली. यावेळी सुमितकुमारच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चालू होतं. त्यानं रमेशला भरपूर दारू पाजली. त्यानंतर रमेशची शुद्ध हरपल्याचं पाहून आरोपीनं रमेशची निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. हेही वाचा- आधी तोंडात बोळा कोंबला मग..; प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाला आईनं निर्दयीपणे संपवलं पण मृत रमेशच्या हातावर असल्याल्या टॅटूमुळे मृताची ओळख पटली. तसेच त्याचे आरोपी सुमितकुमारसोबत पैशांवरून वाद असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. यांतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीनं मृत रमेश यांचं  बानकोडे परिसरात टाकलेलं शिर आणि धड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपासणीसाठी पाठवलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या