JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ...म्हणून थोरातांनी उपसले राजीनामास्त्र, काँग्रेसमधील राजकारणाची INSIDE STORY

...म्हणून थोरातांनी उपसले राजीनामास्त्र, काँग्रेसमधील राजकारणाची INSIDE STORY

बाळासाहेब थोरात यांनी आधी लेटर आणि त्यानंतर गटनेतेपदाचा राजीनामा देऊन आणखी एक बॉम्ब टाकला. पण,

जाहिरात

बाळासाहेब थोरात यांनी आधी लेटर आणि त्यानंतर गटनेतेपदाचा राजीनामा देऊन आणखी एक बॉम्ब टाकला. पण,

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 फेब्रुवारी : नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे काँग्रेसमध्ये एकच गोंधळ पाहण्यास मिळाला. हे थांबत नाही तेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आधी लेटर आणि त्यानंतर गटनेतेपदाचा राजीनामा देऊन आणखी एक बॉम्ब टाकला. पण, सत्यजीत तांबे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभाजी एच.के. पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे गटनेतेपद धोक्यात आले होते. त्यामुळे थोरातांनी राजीनामास्त्र उपसले असल्याचे बोलले जात आहे. बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्याबद्दलची खदखद पत्रातून बोलून दाखवली. त्यानंतर राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली. बाळासाहेब थोरात यांनी अचानक ही खेळी केल्यामुळे एकच कल्लोळ माजला. पण, पक्षातील सध्याच्या परिस्थितीत नाना पटोले यांचा डााव उलटवण्यासाठी थोरात यांची खेळी खेळली, असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे थोरात यांना सहानुभूती मिळेल आणि कोणतीही कारवाई होणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (‘जास्तच इच्छा असेल तर…’, आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार) तर दुसरीकडे, राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यामुळे थोरात यांची मनधरणी करून राजीनामा मागे घेण्यास सांगितले जाईल. पण थोरात आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण या दोघांपैकी एका ज्येष्ठ नेत्याची गटनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यताा आहे. नाना पटोले आज दिल्लीला रवाना होणार आहे. पदवीधर निवडणुकीमध्ये झालेल्या नाट्यावर पक्षश्रेष्ठींकडे पटोले खुलासा करतील. विशेष म्हणजे, राहुल गांधी आणि सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे पटोलेंच्या पाठीशी आहेत. पदवीधरमधील गोंधळामुळे थोरात यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पटोले यांच्यावर कारवाईची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. अशोकराव किंवा पृथ्वीराज चव्हाणांची नेतेपदी वर्णी शक्य 1 प्रदेश कार्यकारिणी बैठक १५ फेब्रुवारीला होणार काँग्रेसमधील या वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या उपस्थितीत १५ फेब्रुवारी रोजी प्रदेश कार्यकारिणीला बैठक होईल. त्यात थोरात, पटोले या दोघांशीही पाटील बोलतील. इतर नेत्यांचीही मते जाणून घेतील व त्यांच्या भावना पक्षाध्यक्ष यांच्यापर्यंत पोहोचवतील. ( आदित्य ठाकरेंविरोधात निहार ठाकरे लढणार? शिंदे गटाने ‘त्या’ बातमीवर केला खुलासा ) तर दुसरीकडे, काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी भाजपने थेट सत्यजीत तांबे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघडपणे तांबे यांना पक्षात येण्यासाठी दार खुले असल्याचे सांगितले. पदवीधर निवडणुकीत विखे समर्थकांनी ऐन निवडणुकीच्या वेळी तांबेंना मदतही केली. पण, तांबेंनी तुर्तास भाजप प्रवेशाचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. तांबे आणि थोरात हे भाजपमध्ये जर आले तर राधाकृष्ण विखे पाटील नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरच्या राजकारणात काय घडेल हे पाहण्याचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या