JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो' मोहन भागवतांनी साधला मुस्लिम समाजाशी संवाद!

'आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो' मोहन भागवतांनी साधला मुस्लिम समाजाशी संवाद!

‘इस्लाम हा परकीय आक्रमणामुळे भारतात आला आहे आणि हा इतिहास आहे. त्यामुळे तो तसाच सांगितलं गेला पाहिजे’

जाहिरात

'इस्लाम हा परकीय आक्रमणामुळे भारतात आला आहे आणि हा इतिहास आहे. त्यामुळे तो तसाच सांगितलं गेला पाहिजे'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 सप्टेंबर : ‘आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो.  इथे दुसऱ्यांच्या मताचा अनादर होणार नाही, राष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे’ असं पत  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat)  यांनी व्यक्त केलं. भागवत यांनी आज मुंबईतील मुस्लिम समाजातील व्यक्तींशी संवाद साधला. मोहन भागवत आज मुंबईच्या दौऱ्यावर आहे.  ग्लोबल स्टेटर्जिक पॉलिसी (Global Strategic Policy) या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी’ या विषयावर मोहन भागवत यांनी आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील उच्चविभूषित व्यक्तींना बोलावण्यात आले होते. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिम याचे पूर्वज हे एक आहेत. देश पुढे जायचा असेल तर सर्वांना सोबत जावे लागेल.  आमच्या साठी हिंदू हा शब्द आहे, मातृभूमी , गौरवशाली परंपरा आणि आपले पूर्वज यांचा प्रतिशब्द आहे, असं भागवत म्हणाले. सफाई कर्मचारी बनला ‘सुपरहिरो’, चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून खेचलं; थरारक VIDEO तसंच, भारतात  दुसऱ्यांच्या मताचा अनादर होणार नाही. आपल्याला एकट्या मुस्लिम वर्चस्वाची नव्हे तर देशाच्या वर्चस्वाचा विचार करावा लागेल. देशाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे, अस आवाहनही भागवत यांनी केलं. चंद्रपूर हादरलं! दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाला ‘इस्लाम हा परकीय आक्रमणामुळे भारतात आला आहे आणि हा इतिहास आहे.  त्यामुळे तो तसाच सांगितलं गेला पाहिजे.  यातील आततायी गोष्टी सुशिक्षित लोकांनी समजावून द्यायला हव्यात. कट्टरपंथी लोकांचा विरोध करण्यासाठी आताच जागृत व्हावे लागेल. या जागृतीसाठी जेवढा वेळ लावू तेवढं समाजच नुकसान होईल, अशी चिंताही भागवत यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या