JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / उद्धव ठाकरेंनी शड्डू ठोकला, नगरपरिषदा निवडणुकांसाठी थेट मैदानात उतरणार, जिल्हा प्रमुखांना महत्त्वाच्या सूचना

उद्धव ठाकरेंनी शड्डू ठोकला, नगरपरिषदा निवडणुकांसाठी थेट मैदानात उतरणार, जिल्हा प्रमुखांना महत्त्वाच्या सूचना

उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आज संपूर्ण राज्यातील जिल्हा प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडलं असलं तरी या जखमेवर मात करुन पुन्हा नव्याने शिवसेना उभी करण्याचा संकल्प शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे प्रचंड कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे दररोज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाने नुकतंच नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या नगर परिषदेच्या निवडणुकींमध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक जागा जिंकून याव्यात यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व जिल्हा प्रमुखांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे पाऊस नसेल तर आपण स्वत: नगर परिषदेच्या प्रचारात सभेसाठी येवू, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. शिवसेना नगरपरिषदांच्या निवडणुका ताकदीने आणि स्वबळावर लढवणार आहे. उद्धव ठाकरेंची जिल्हा प्रमुखांसोबतच्या बैठकीत याबाबतचं वक्तव्य केलं. सत्तेत असताना केलेली कामे जनतेच्या समोर मांडा. पक्षाच्या भूमिका लोकांपर्यंत घेऊन जा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना दिल्या. तसेच पाऊस नसेल तर मी स्वत: सभेसाठी येईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ( कंगनाच्या इंदिरा गांधींबरोबर झळकणार मराठमोळा अभिनेता; Emergency मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ) उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आज संपूर्ण राज्यातील जिल्हा प्रमुखांची बैठक झाली. निवडणूक आयोगाकडून नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्यांनी निवडून यावं यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरेंनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांना सर्वसामान्यांमध्ये पक्षाची भूमिका पोहोचवा. आपण सरकारमध्ये केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यामाध्यमातून जास्तीत जास्त जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना ठाकरेंनी दिल्या आहेत. लढाईला तयार राहा. कुणी गेले आहे, याचा विचार न करता या निवडणुकीत शिवसेना मजूबत असल्याचे दाखवून द्या. आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. तळागाळात जावून लोकांची कामे करा. मुंबईत ज्याप्रमाणे पक्ष काम करतोयत्याप्रमाणे राज्यातही कामे करा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या