मुंबई, 27 एप्रिल: कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. आता 1 तारखेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली (1st may vaccination) जाणार आहे. पण, राज्यात लशी तुटवडा असल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा यावर भाष्य करण्याचे टाळले असून ‘उद्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या (Cabinet meeting MVA Government) बैठकीत लसीकरणावर निर्णय घेतला जाईल’, असं उत्तर दिले आहे. राज्यात 1 तारखेपासून लसीकरण कशा पद्धतीने होणार याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाची लसीकरण कसे होणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. पत्रकारांनी अजित पवार यांनाबद्दल विचारले असता ते म्हणाले की,‘उद्या कॅबिनेटमध्ये लसीकरणावर अंतिम निर्णय होईल, मी आताच काही मत व्यक्त करणार नाही. लशीचा तुटवडा राज्यातच नाही तर संपूर्ण देशात आहे. ऑक्सिजन, रेमडेसीवीर आणि लशीवर आता केंद्राचा कंट्रोल आहे. त्यामुळे देशाच्या प्रमुखांना सांगितलं की त्यावर योग्य निर्णय घेतला जात आहे’ तुम्ही सॅनिटायझरचा योग्य पद्धतीने वापर करता आहात का? जाणून घ्या योग्य पद्धत ‘मोफत लस द्यावी याबद्दल सर्वांची आग्रही मागणी आहे. त्याबद्दल सर्वांना बोलायचा अधिकार आहे, प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करू शकतो. पण, याबद्दल योग्य तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर करतील, असंही अजित पवारांनी स्पष्ट केले. ‘रेमडेसीवीर इंजेक्शन वाटपाबद्दल सुजय विखे पाटील यांचे फोटो व्हायरल झाले. विरोधक असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या लोकांनी याचा अतिरेक करू नये.’ असा टोलाही अजित पवारांनी विखेंना लगावला. ‘देशातल्या जनतेचं लसीकरण करण्याचं काम केंद्राने केले पाहिजे पण अद्याप लसीकरणावर केंद्राची भूमिका स्पष्ट नाही’ असा टोलाही पवारांनी केंद्राला लगावला. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची गरज? तज्ज्ञांनी दिलं उत्तर ‘राज्यात कोरोना लसीकरणावर महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतील, राज्याचा आर्थिक भार या सगळ्यावर आहे, त्यामुळे इतरांनी बोलणं टाळलेलं बरं’ असा टोलाही पवारांनी लगावला. ‘अनिल देशमुखांच्या चौकशीत सीबीआयची भूमिका निपक्षपाती राहिली पाहिजे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यानं जास्त कोणी बोलू नये.’ असा सल्लाही पवारांनी दिली.