या आंदोलनात आतापार्यंत 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई, 28 सप्टेंबर : मुंबई (mumbai) वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, हा निर्णय बदलण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र, महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत, यावर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहितीसमोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाव करण्याचा निर्णय घेतला होता. पण, या निर्णयाबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचार केले जातील, असे स्पष्ट संकेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले होते. बापरे! चिमुकलीच्या पापण्या, डोक्यावरील केस गायब; कोरोना लॉकडाऊनचा भयंकर परिणाम पण, महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत. महापालिकेत तीन ऐवजी दोन सदस्य प्रभाग पद्धत असावी अशी मागणी काँग्रेसने केली होती. यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. यावेळी काँग्रेसने काहीशी आक्रमक भूमिकाही घेतली होती मात्र, प्रभाग रचनेत कोणतेही बदल न करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय कायम आहे. त्यामुळे महापालिकेत तीन सदस्य प्रभाग पद्धत कायम राहणार आहे. Redmi-Realme ला टक्कर देण्यासाठी आता Flipkartचा मोबाइल लाँच,आहेत भन्नाट फीचर्स विशेष म्हणजे, तीन प्रभाग रचनेबद्दलचा निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) हे यावर नक्कीच तोडगा काढतील. प्रभाग 3 चा असावा की 2 चा असावा हे मुख्यमंत्रीच ठरवतील, कॅबिनेटमध्येच प्रभाग निश्चितीवर अंतिम निर्णय होईल. महाविकास आघाडी सरकारमधील काही घटकांनी वेगळी मतं नोंदवली. त्यावर सीएम सर्वमान्य तोडगा काढतील, आमच्यात कोणतेही वाद नाहीत, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. पण, हा निर्णय आता कायम राहणार आहे. असा आहे निर्णय - मुंबई महापालिका 1 वार्ड पद्धती - उर्वरित महापालिका 3 सदस्य प्रभाग - नगरपालिका नगर परिषद 2 सदस्य प्रभाग - नगर पंचायतीला वार्ड नुसार सदस्य असतील